आता गुगल मॅपच्या नवीन फीचर्समुळे प्रवासापूर्वीच टोल टॅक्सची किंमत समजणार

आता गुगल मॅपच्या नवीन फीचर्समुळे प्रवासापूर्वीच टोल टॅक्सची किंमत समजणार

गुगलचं लोकप्रिय अॅप गुगल मॅपवर आता लवकरच नवीन फीचर्स जोडले जाणार आहेत. ज्याला या महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. हे फीचर तुमची टोल टॅक्सपासून वाचण्यासाठी मदत करणार आहे. तसेच टोल प्राइज फीचरच्या मदतीने तुम्हाला जवळपासच्या टोल बूथबद्दल माहिती मिळू शकणार आहे, याशिवाय तुम्हाला टोल टॅक्सची किंमतसुद्धा कळू शकणार आहे, यासाठी गुगलने स्थानिक टोल प्राधिकरणाशी भागीदारी केलेली आहे. या नवीन सुविधेच्या माध्यमातून तुम्हाला टोल मार्ग निवाडायचा की नॉन-टोल मार्ग निवडायचा हे दोन पर्याय दिलेले आहेत. Android आणि iphone यूजर्ससाठी या महिन्यापासून ही सुविधा चालू करण्यात येईल.

गुगलने माहिती दिली आहे की, टोल प्राइज फीचरला भारतासह यूएस, जपान आणि इंटोनेशियामध्ये सुद्धा चालू करण्यात येईल. तसेच इंटोनेशियामध्ये सुमारे २,००० टोल रस्त्यांसाठी या महिन्यात Android आणि iOS वर टोलची किंमत सुरू होईल.

पैसे वाचवण्यासाठी मदत

तुम्हाला टोल टाळायचा असेल तर, गुगल मॅप तुम्हाला त्याचा मार्ग सुद्धा सांगण्यासाठी मदत करेल. तुम्हाला टोल व्यतिरिक्त टोलमुक्त मार्गाचा पर्याय सांगण्यात येईल, परंतु यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये टोल टॉक्स टाळा हा पर्याय निवडावा लागेल.

iphone यूजर्स आणि Apple Watch साठी बदल

Apple यूजर्ससाठी गुगल मॅपला खूप चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी गुगलने एक खास बदल केलेला आहे. iphone यूजर्स आणि Apple Watch साठी पिन्ड ट्रिप फीचर जोडण्यात आलेल आहे, या फीचरच्या मदतीने यूजर्स येणाऱ्या रस्त्याला पिन करू शकता. तसेच तुमच्या आवडत्या रस्त्याला डिवाइसच्या होम स्क्रीनवरसुद्धा ठेवू शकता.

First Published on: April 7, 2022 11:44 AM
Exit mobile version