OLA च्या इलेक्ट्रिक स्कूटरची प्रतिक्षा संपली; ‘या’ दिवशी होणार लाँच

OLA च्या इलेक्ट्रिक स्कूटरची प्रतिक्षा संपली; ‘या’ दिवशी होणार लाँच

ओला १५ ऑगस्टला इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार

ओलाच्या (OLA) इलेक्ट्रिक स्कूटरची गेली कित्येक दिवस वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ओला १५ ऑगस्टला इलेक्ट्रिक स्कूटरची लाँचिंग करणार आहे. ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी याची घोषणा केली. यावेळी त्यांनी यासबंधीची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचं सांगितलं. ज्यांनी स्कूटर बुक केली त्यांचे आभार देखील त्यांनी मानले.

ज्यांनी आमची स्कूटर बुक केली आहे त्या सर्वांचे आभार! आम्ही १५ ऑगस्ट रोजी ओला स्कूटर लाँच करण्याचा विचार करत आहोत. आम्ही यासंदर्भात उत्पादनाची संपूर्ण माहिती देऊ, असं सांगितलं भाविश यांनी सांगितलं. दरम्यान, कंपनीने १५ जुलैपासून आपल्या ई-स्कूटरची बुकिंग सुरू केली. कंपनी ई-स्कूटरची डिलिव्हरी थेट घरापर्यंत करणार असल्याची माहिती दिली. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या डोअर स्टेप डिलिव्हरीसाठी स्वतंत्र लॉजिस्टिक विभाग तयार करणार आहे. हा विभाग ग्राहकांना थेट खरेदी आणि कागदपत्रे, कर्ज आणि इतर सुविधा प्रदान करेल.

ओलाने ई-स्कूटरचा व्हिडिओ जारी केला आहे. सुरुवातीला चार रंगांमध्ये स्कूटर उपलब्ध असेल असं सांगितलं जात होतं. परंतु, आता ई-स्कूटर आता दहा रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. OLA Scooter ला कंपनीच्या वेबसाईटवर फक्त ४९९ रुपयांमध्ये बुक करता येऊ शकते. ही रक्कम पुन्हा मिळणार आहे.

First Published on: August 3, 2021 2:56 PM
Exit mobile version