‘वनप्लस ८’ सीरिज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

‘वनप्लस ८’ सीरिज भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसने ‘वनप्लस ८’ सीरिज भारतात लाँच केली आहे. आता ग्राहक या सीरिजचे वनप्लस ८ आणि ८ प्रो स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत साइट, स्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवरुन खरेदी करू शकतील. या व्यतिरिक्त कंपनीने भारतीय बाजारात वनप्लस बुलेट झेड इअरफोन देखील आणले आहेत.

वनप्लस ८ आणि ८ प्रो ची किंमत

कंपनीने ‘वनप्लस ८’ ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात आणला आहे. ६ जीबी रॅम स्मार्टफोनची किंमत ४१,९९९ रुपये आहे, तर ८ जीबी रॅम स्मार्टफोनची किंमत ४४,९९९ रुपये आहे आणि १२ जीबी रॅमस्मार्टफोनची किंमत ४९,९९९ रुपये आहे. दुसरीकडे, वनप्लस ८ प्रो ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजच्या बेस व्हेरिएंटची किंमत ५४,९९९ आहे. तर, त्याचे टॉप-एंड मॉडेल १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ५९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

वनप्लस ८चे स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे, ज्याचा अॅस्पेक्ट रेशो २०:९ आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याच वेळी हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. कॅमेर्‍याविषयी बोलताना, वापरकर्त्यांना या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळाला आहे, ज्यात ४८-मेगापिक्सलचा प्राइमरी लेन्स, २-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आणि १६-मेगापिक्सलचा tertiary सेन्सर आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाइप-सी सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. याशिवाय या फोनमध्ये ४३०० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जो रॅप चार्ज 30Tला सपोर्ट करतो.


हेही वाचा – iPhone SE 2 भारतात लाँच, किंमत बघून बसेल सुखद धक्का

वनप्लस ८ प्रो वैशिष्ट्ये

कंपनीने वनप्लस ८ प्रो स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा क्यूएचडी प्लस डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रीफ्रेश दर १२० हर्ट्ज आहे. तसेच या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याच वेळी हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. कॅमेर्‍याविषयी सांगायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये युजर्सला क्वाड कॅमेरा सेटअपचा सपोर्ट मिळाला आहे, ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, ४८ मेगापिक्सेल टेरिटरी सेन्सर आणि ५ मेगापिक्सल कलर फिल्टर सेन्सर आहे. या व्यतिरिक्त या फोनला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाइप-सी सारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. याशिवाय 30T फोन रॅप चार्जसह ४५१० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

वनप्लस बुलेट झेड इअरफोन्सची किंमत

कंपनीने या इयरफोनची किंमत १,९९९ रुपये ठेवली आहे. त्याचबरोबर वनप्लस ८ मालिकेसह हे इअरफोन ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर उपलब्ध असतील. तथापि, कंपनीने अद्याप या सर्व उपकरणांच्या विक्रीबद्दल फारशी माहिती दिली नाही.

 

First Published on: April 20, 2020 6:09 PM
Exit mobile version