‘वनप्लस ७टी’ सिरीज आणि ‘वनप्लस टीव्ही’चे ‘हे’ आहेत फिचर्स

‘वनप्लस ७टी’ सिरीज आणि ‘वनप्लस टीव्ही’चे ‘हे’ आहेत फिचर्स

'वनप्लस ७टी' सिरीज आणि 'वनप्लस टीव्ही'चे 'हे' आहेत फिचर्स

आज भारतात वनप्लस ही चिनी कंपनी टीव्ही आणि मोबाइल लाँच करणार आहे. दिल्लामध्ये संध्याकाळी ‘वनप्लस टीव्ही’ आणि ‘वनप्लस ७ टी’ हा मोबाइल लाँच करणाच्या सोहळा पार पडणार आहे. वनप्लस कंपनी १५ ऑक्टोबरला ‘वनप्लस ७ टी प्रो’ सीरीजमधील हा देखील मोबाइल लाँच करणार आहे. तर आज आपण जाणून घेऊन या सोहळ्यात लाँच होणाऱ्या टीव्ही आणि मोबाइलच्या फिचर्सबद्दल.

जाणून घ्या वनप्लस टीव्हीचे फिचर्स

या टीव्हीमध्ये ८ इनबिल्ड स्पिकर आहेत. तसंच हाय एंट वेरियंट 4kHDR डिस्प्लेला सपोर्ट करणारा हा टीव्ही आहे. ओएळइडी पॅनल या टीव्हीत नसणार आहे. वनप्लस हा टीव्ही ५५ इंच वेरियंटमध्ये लाँच होण्याची शक्यता अहवालानुसार देण्यात आली आहे.

जाणून घ्या वनप्लस ७टीचे फिचर्स

या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेरासोबत १२ मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स असून १६ मेगापिक्सल कॅमेरा असण्याची शक्यता आहे. या फोनच्या बॅटरीमध्ये ३,८०० एमएच इतकी क्षमता असणार आहे. इन डिस्प्ले फ्रिंगरप्रिंट सेन्सरसोबत ६.५५ इंचाचा अमॉल्ड डिस्प्ले देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज वेरिएंट असतील.

First Published on: September 26, 2019 2:55 PM
Exit mobile version