50MP कॅमेरावाला OnePlus Nord 2 स्मार्टफोन २२ जुलैला होणार लाँच

OnePlus Nord 2 स्मार्टफोन २२ जुलैला होणार लाँच

भारतात २२ जुलै रोजी वनप्लस नॉर्ड 2 (OnePlus Nord 2) भारतात लाँच होणार आहे. यापूर्वीही कंपनीने आगामी फोनचे डिझाईन शोकेस केले आहे. ट्रिपल कॅमेरा सेट अप या फोनला देण्यात आला आहे. गेल्या वर्षी वनप्लस नॉर्ड लाँच झाला होता. त्याच फोनचा हा अपग्रेड व्हर्जन असू शकतो.

OnePlus Nord 2 ला मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यामुळे मीडियाटेक प्रोसेसरसह येणारा पहिला वनप्लस फोन असेल. वनप्लसने आपल्या oneplus.nord इंस्टाग्राम अकांउटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये आगामी वनप्लस नॉर्ड 2 ची मागील डिझाइन पाहू शकता. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप फोनला देण्यात आला आहे. फ्लॅशच्या पुढे दोन मोठे सेन्सर आणि एक छोटा सेन्सर आहे. वनप्लस नॉर्ड 2 च्या डिझाईन संदर्भात सध्या अशीच माहिती समोर आली आहे. वनप्लसचा हा नवीन फोन २२ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता भारतात लॉन्च होईल. अशी अपेक्षा आहे की कंपनी यासाठी व्हर्च्युअल कार्यक्रम आयोजित करेल, ज्याचे थेट प्रक्षेपण YouTube आणि कंपनीच्या वेबसाइटवर केले जाईल.

वनप्लस नॉर्ड 2 5G साठी पुष्टी झाली की हा फोन MediaTek Dimensity 1200-AI प्रोसेसरसह येईल. याव्यतिरिक्त, यात 90Hz रिफ्रेश रेट, OxygenOS 11 आणि 50MP प्रायमरी कॅमेर्‍यासह 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले देखील मिळेल.

First Published on: July 17, 2021 10:14 PM
Exit mobile version