OnePlus कंपनीचा ‘स्मार्ट टीव्ही’ लवकरच

OnePlus कंपनीचा ‘स्मार्ट टीव्ही’ लवकरच

'वनप्लस'चा स्मार्ट टीव्ही लवकरच (प्रातिनिधिक फोटो/सौजन्य- mensxp)

‘वन प्लस’ ही सध्याच्या मोबाईल बनवणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांमधील एक आहे. वन प्लसच्या स्मार्टफोन्सना बाजारामध्ये चांगलीच मागणी आहे. कंपनीच्या OnePlus 6 या लेटेस्ट मॉडेलला देखील ग्राहकांडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आयफोनना टक्कर देणार फोन आशी वन प्लसच्या फोन्सची ओळख आहे. मात्र, आता वन प्लस कंपनीने गॅजेट निर्मिती क्षेत्रामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. लवकरच OnePlus त्यांचा नवा स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहेत. वन प्लस कंपनीचे सीईओ पीट लाऊ यांनी एका ब्लॉग पोस्टद्वारे स्वत: याविषयीची अधिकृत माहिती दिली आहे. पीट यांनी दिलेल्या माहितीनुसार वन प्लसच्या या नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना कमीत कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त आणि आत्याधुनिक फिचर्सचा लाभ घेता येईल.

महत्वाचा निर्णय : या तीन बँकांचे होणार विलिनीकरण

 

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य- Digit)

वन प्लसचे सीईओ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटल्यानुसार, ‘बऱ्याचशा नवीन आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सनी आपलं जीवन अधिक सुखकर केलं आहे. मात्र, बदलत्या काळामध्ये टेलिव्हीजन काहीसा जुना झाला आहे. आम्ही त्याच टेलिव्हिजनचं स्मार्ट व्हर्जन ग्राहकांसाठी देण्याच्या प्रयत्नात आहोत. ज्यामुळे त्यांना टीव्हीचा नव्याने आनंद घेता येईल’.


वाचा : हे ३ नवीन iPhones भारतात लाँच

First Published on: September 17, 2018 8:06 PM
Exit mobile version