Oneplus मोबाईल Apple पेक्षा भारी, ‘Siri’ चा खुलासा

Oneplus मोबाईल Apple पेक्षा भारी, ‘Siri’ चा खुलासा

‘वनप्लस’ या स्मार्टफोन बनवणाऱ्या चिनी कंपनीने जगभरातील ग्राहकांना आपलंसं केलं आहे. वनप्लसने त्यांच्या एक से एक शानदार स्मार्टफोन्सच्या बळावर जगभरातील बाजारपेठांमध्ये स्वत:चे पक्के स्थान निर्माण केले आहे. चीनपाठोपाठ भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्मार्टफोनची बाजारपेठ आहे. त्यामुळे स्मार्टफोन बनवणाऱ्या सर्वच कंपन्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असतात. या स्पर्धेत अव्वल राहण्यासाठी Apple पासून Oneplus पर्यंत सर्वच मोठ्या कंपन्या एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. ग्राहकांना परवडेल अशा दरांत स्मार्टफोन्सची विक्री करुन किंवा फोन खरेदीवर भन्नाट ऑफर्स देऊन, या कंपन्या आपली टॉप पोझिशन कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असतात.

सोशल मीडियावरही हे मोठे ब्रँड्स एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही. यामध्ये आता Oneplus नेही उडी घेतली आहे. अॅपलचा व्हर्च्युअल असिस्टंट – Siri ला ‘भारताचा नंबर 1 प्रीमियम स्मार्टफोन कोणता’? असा प्रश्न वनप्लसने ट्वीटरवरुन विचारला होता. अर्थात या ट्विटमध्ये त्यांनी थेट Apple कंपनीचा उल्लेख केला नव्हता. मात्र, ट्विटसोबत एक फोटो शेअर करुन त्यावर, ‘हे Siri…भारतातील नंबर 1 प्रीमियम स्मार्टफोन कोणता?’ असा प्रश्न विचारला होता. त्याचसोबत ‘हे माझं तुला आव्हान आहे’ असा मजकूरही ट्विटमध्ये नमूद करण्यात आला होता.

Oneplus ने केलेल्या या ट्वीटमुळे Apple कंपनीला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. ‘जगातला सर्वात चांगला स्मार्टफोन कोणता असा प्रश्न ‘सिरी’ला जेव्हा विचारला जाणं आणि त्यावर सिरीने Oneplus हे उत्तर देणं’, अॅपल्च्या चांगलच पथ्यावर पडलं आहे. या ट्रोलिंगचा वनप्लसला कंपनीला प्रत्यक्षात किती फायदा होणार? सिरीच्या या उत्तरामुळे भारतीय बाजारपेठेत Apple फोन्सच्या खरेदीवर आणि OnePlus फोन्सच्या विक्रीवर खरंच परिणाम होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

दरम्यान, या ट्वीटनंतर वनप्लसने अजून एक ट्विट करत अॅपल कंपनीवर निशाणा साधला आहे. ‘आमच्या स्मार्टफोनमध्ये सिरीसारखं फीचर नाहीये, तुम्ही गुगल असिस्टंट वापरा’ असा संदेश ग्राहकांना देताना वनप्लसने अॅपलला चांगलाच टोला हाणला आहे.


जाणून घ्या : Gmail चे ३ नवीन फिचर्स

First Published on: January 31, 2019 4:20 PM
Exit mobile version