OnePlus Z स्मार्टफोन १० जुलैला लाँच होणार

OnePlus Z स्मार्टफोन १० जुलैला लाँच होणार

चिनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन घेऊन येत आहे. वनप्लस झेड स्मार्टफोन लाँच केला जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु काही ठिकाणी याला वनप्लस ८ लाइट असंही म्हटलं जात आहे. वनप्लसने आज जाहीर केलं आहे की २ जुलै रोजी लाँचिंग कार्यक्रम होणार असून तो ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यावेळी कंपनी स्वस्त स्मार्ट टीव्ही बाजारात आणणार आहे. भारतात या नव्या स्मार्ट टीव्हीमुळे कंपनी शाओमी आणि रियलमीला टक्कर देणार आहे. एका आठवड्यानंतर, १० जुलै रोजी, वनप्लस झेड किंवा वनप्लस ८ लाइट हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून, वनप्लस झेडशी संबंधित माहिती लीक होत आहे. OnePlus Z मध्ये ६.५५ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात येणार आहे आणि रीफ्रेश दर 90Hz असेल. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात येणार आहे. फोटोग्राफीसाठी OnePlus Z मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 48MPची प्राथमिक लेन्स असेल, तर 16MPची वाइड अँगल लेन्स आणि 2MPच्या मॅक्रो लेन्स दिल्या जाणार आहेत. या फोनची किंमत २४,९९० रुपये सांगितली जात आहे. OnePlus Z किंवा OnePlus Z 8 लाइटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.


हेही वाचा – ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईमध्ये कोरोनासदृश्य लक्षणं; रुग्णालयात दाखल


 

First Published on: June 9, 2020 3:45 PM
Exit mobile version