Oppoच्या ‘या’ फोनची बॅटरी होणार फक्त ३० मिनिटांत फुल्ल

Oppoच्या ‘या’ फोनची बॅटरी होणार फक्त ३० मिनिटांत फुल्ल

चीनची स्मार्टफोन कंपनी असणाऱ्या ओप्पोने फास्ट चार्जिंग टेक्नलॉजीची घोषणा केली आहे. कंपनी ही टेक्नलॉजी लवकरच ‘ओप्पो रेनो एस’ स्मार्टफोनमध्ये वापरणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. ‘ओप्पो रेनो एस’ ६५ वॅटच्या फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत ऑक्टोबरमध्ये लाँच होणार आहे.

या स्मार्टफोनचा पहिला ऑफिशिअल प्रोमो इमेज नुकतेच सादर करण्यात आल्यानंतर या स्मार्टफोनच्या ६५ वॅटच्या फास्ट टेक्नलॉजीची झलक बघायला मिळाली. चीनच्या सोशल मीडियाच्या संकेतस्थळावर या स्मार्टफोनचा एक व्हिडिओ पाहायला मिळाला. यामध्ये दोन ओप्पोच्या स्मार्टफोन्सची तुलना करण्यात आली होती. यामध्ये एक ६५ वॅटशिवाय चार्जिंग होणारा फोन तर दुसरा या टेक्नलॉजीचा वापर करून चार्ज करण्यात येत होता.

या टेक्नलॉजीच्या सहाय्याने ग्राहकाच्या स्मार्टफोनमध्ये असणारी ४०००एमएच बॅटरी ३० मिनिटांत पुर्ण चार्ज करू शकतात, असे कंपनीने सांगितले आहे. यानुसार ५ मिनिटांत हा ,स्मार्टफोन २७ टक्के चार्ज होतो. या टेक्नलॉजीमध्ये कस्टमाइज आणि अॅडव्हान्स कंपनेंट्स, डिजाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसची मदत घेतली आहे. या प्रोसेसच्या मदतीनं चार्जिंगची क्षमता वाढवण्याच्या बरोबर चार्जिंगच्या वेळी फोन गरम न होता सुरक्षितपणे चार्जिंग होते.

First Published on: September 19, 2019 4:21 PM
Exit mobile version