Paytm ने लाँच केलं क्रेडिट कार्ड; प्रत्येक खरेदीमागे मिळणार कॅशबॅक

Paytm ने लाँच केलं क्रेडिट कार्ड; प्रत्येक खरेदीमागे मिळणार कॅशबॅक

Paytm ने भारतात क्रेडिट कार्ड लाँच केलं आहे. या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यावर प्रत्येक खरेदीमागे कॅशबॅक ऑफर्स मिळणार आहेत. कंपनीने म्हटलं आहे की, नेक्स्ट जनरेशन क्रेडिट कार्ड लाँच करणार आहे. पेटीएम पुढील १२-१८ महिन्यांत २० लाख कार्ड देण्याचं लक्ष असणार आहे.

पेटीएमने दिलेल्या माहीतीनुसार, कंपनी क्रेडिट कार्डसाठी अनेक कार्ड देणार्‍या ब्रँडसोबत भागीदारी करीत आहे ज्या अंतर्गत को-ब्रँड कार्ड दिले जातील. पेटीएम क्रेडिट कार्डसह बरेच फीचर्स दिले जाणार आहेत. App च्या माध्यमातून आपण Paytm Credit Card चा पिन बदलू शकतो, पत्ता ब्लॉक करुन अपडेट करू शकाल. कंपनीने म्हटलं आहे की वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड रिअल टाइम मॅनेज करता येणार आहे.

कार्डससोबत फसवणूकीसाठी विमा देखील प्रदान केला जाईल. प्रत्येक व्यवहारासोबत ग्राहकांना कॅशबॅक मिळेल असं कंपनीने म्हटलं आहे. कॅशबॅक पेटीएम गिफ्ट व्हाउचरच्या रूपात असेल, जो पेटीएम इकोसिस्टममध्ये वापरला जाऊ शकतो. पेटीएम क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी, कंपनी ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअर आणि पेटीएम व्यवहाराचा इतिहास/खरेदी पॅटर्नचा आधार घेणार आहे. पेटीएम क्रेडिट कार्ड Application ची प्रक्रिया देखील डिजिटल असेल. पेटीएम अॅपवर कार्डसाठी एक डेडीकेशन विभाग असेल जिथून ते व्यवस्थापित करू शकतात.

 

First Published on: October 19, 2020 9:15 PM
Exit mobile version