Corona Vaccination: आता Paytmवर मिळणार कोविड लसीकरण स्लॉट माहिती, कशी ती जाणून घ्या

Corona Vaccination: आता Paytmवर मिळणार कोविड लसीकरण स्लॉट माहिती, कशी ती जाणून घ्या

पेटीएमने पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

संपूर्ण देशभरात कोरोनाला थोपविण्यासाठी लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आता लसीकरण मोहीमेला हातभार लावण्यासाठी देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट App पेटीएम (Paytm) पुढे आली आहे. पेटीएमने कोविड लसीकरण स्लॉट सर्च करण्यासाठी एक नवे टूल Paytm Vaccine Slot Finder लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. लस घेताना महापालिका केंद्र आणि वेळ सांगते. या केंद्रावर कोणत्या वेळात किती लसीचे डोस आहेत, याची माहिती मिळते. त्यामुळे हेच स्लॉट्स आता पेटीएमवर दिसणार आहेत. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्वीटद्वार याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पेटीएम वापकर्त्यांना (युझर) आपल्या क्षेत्रातील लसीकरणासाठी नवे स्लॉक उपलब्ध झाल्यावर अलर्ट मिळेल. त्यामुळे जाणून घ्या पेटीएमच्या या नव्या टूलबद्दल…

आज (गुरुवार) विजय शेख शर्मा यांनी ट्वीट करून सांगितले की, कंपनी कोविड लसीकरण स्लॉटसाठी एक नवीन टूल लाँच करत आहे, ज्यामुळे वापरकर्ते स्लॉट पाहू शकतील. या टूलच्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या क्षेत्रामधील नवे स्लॉट उपलब्ध झाल्यावर अलर्ट मिळेल. शिवाय नवे स्लॉट उघडल्यावर पेटीएम चॅटच्याद्वारे वास्तविक-वेळ (रियल-टाईम) उपलब्धता आणि अलर्ट वापरकर्त्यांना मिळेल.

पेटीएमचे म्हणणे आहे की, कंपनी वास्तविक-वेळमध्ये देशभरातील उपलब्ध लसीकरण स्लॉटला ट्रॅक करत आहे. Paytm Vaccine Slot Finder च्या द्वारे नवीन स्लॉट उघडल्यास वापरकर्ते तो स्लॉट बुक करू शकतात आणि इंस्टेंट अलर्ट मिळू शकतात.


हेही वाचा – मोबाईलवर बघून चालणार्‍यांना अडथळा दिसताच गुगल देणार अलर्ट, काय आहे फीचर?


 

First Published on: May 6, 2021 4:01 PM
Exit mobile version