भारतात २२ सप्टेंबर रोजी लाँच होणार Poco X3 स्मार्टफोन; जाणून घ्या, फीचर्स

भारतात २२ सप्टेंबर रोजी लाँच होणार Poco X3 स्मार्टफोन; जाणून घ्या, फीचर्स

भारतात 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता Poco X3 लाँच होणार असून कंपनीने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. अशी अपेक्षा आहे की Poco X3 मागील आठवड्यात युरोपियन बाजारात लाँच झालेल्या Poco X3 NFC चे व्हर्जन असेल. सध्या ट्विटमध्ये या शिवाय अधिक कोणती माहिती देण्यात आलेली नाही. फ्लिपकार्टवर Poco X3 चे एक पेज तयार करण्यात आले असून यानुसार आगामी स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 732 G प्रोसेसर Poco X3 NFC प्रमाणेच असून तो 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध होणार आहे.

पोको इंडियाने ट्विटरवर 10 सेकंदाचा व्हिडिओ टीझर जारी केला असून, अशी माहिती दिली आहे की 22 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता Poco X3 भारतात लाँच होईल. या 10 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये फोनची वैशिष्ट्ये दाखवण्यात आली आहे. तसेच सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल डिझाइन आणि क्वाड कॅमेरा सेटअप देखील दाखवण्यात आला आहे.

पोकोच्या इतर मॉडेल्सप्रमाणेच Poco X3 ची विक्री देखील फ्लिपकार्टद्वारे होणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या आगामी स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल कंपनीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तर अलीकडेच एका टिप्स्टरने असा दावा केला आहे की, त्याची लाँचिंग भारतात 18,999 किंवा 19,999 रुपयांत करण्यात येणार आहे.

असे आहेत फीचर्स

भारतात हा स्मार्टफोन युरोपमध्ये लाँच झालेल्या Poco X3 NFC पेक्षा थोडा वेगळा असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यात अधिक काळ टिकणारी बॅटरी आणि 8 जीबी पर्यंतची रॅम देण्यात येणार असून या व्यतिरिक्त स्वतः कंपनीने स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले जाहीर केले आहे. क्वाड कॅमेरा सेटअप देखील त्याच्या मागील बाजूस असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.


जबरदस्त फीचर्ससह Sony Xperia 5 II स्मार्टफोन झाला लाँच

First Published on: September 17, 2020 11:10 PM
Exit mobile version