टिकटॉक बंदीनंतर स्वदेशी ‘Moj’ App झाला लोकप्रिय

टिकटॉक बंदीनंतर स्वदेशी ‘Moj’ App झाला लोकप्रिय

टिकटॉक बंदीनंतर स्वदेशी 'Moj' App झाला लोकप्रिय

भारत सरकारने बंदी घातलेल्या ५९ चिनी Appsपैकी सर्वाधिक चर्चा सध्या टिकटॉकची आहे. कारण युजर्स या Appचा वापर मनोरंजनासह आपले टॅलेंट शेअर करण्यासाठी करत होते. अशा परिस्थितीत युजर्स आता टिकटॉक ऐवजी अन्य शॉर्ट व्हिडिओ शेअरिंगसाठी Apps सर्च करत आहेत. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर बरेच स्वदेशी App लाँच झाले आहेत आणि हे Apps लोकप्रिय देखील होऊ लागले आहेत. यापैकी एक App म्हणजे ‘Moj’ App. हा App लाँच होऊन दोन दिवस झाले असून हा App डाऊनलोड करण्याची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ShareChat द्वारे Moj App विकसित केला आहे. हा App गूगल प्लेस्टोअरवरून ५० हजाराहून अधिक वेळा डाऊनलोड केला आहे. तसेच या Appची ४.३ रेटिंग आहे. हा App हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड आणि पंजाबी अशा एकूण १५ भाषांमध्ये उपलब्ध आहे. या १५ भाषांमध्ये फक्त भारतीय भाषांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये इंग्रजी भाषेला स्थान दिले नाही.

Moj App हा एक शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग App आहे. तसेच हा स्वदेशी App आहे. या Appमध्ये युजर्स आपले व्हिडिओ शेअर करू शकतात. तसेच इतर व्हिडिओ देखील पाहू शकतात आणि शेअर पण करू शकतात. यामध्ये व्हिडिओ तयार करण्याचा टाईम १५ सेकंद आहे. म्हणजे युजर्स १५ सेकेंदात व्हिडिओ तयार करून तो फिल्टर करून शेअर करू शकतो. या Appमधला व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम, Whatsapp आणि ट्विटर अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता. Moj Appमध्ये डान्स, कॉमे़डी, Vlog, न्यूज, फूड, एंटरटेनमेंट, गाणी आणि लव शायरी सारखे कंटेंट  आहेत.


हेही वाचा – घरबसल्या ऑनलाईन बनवा रेशन कार्ड


 

First Published on: July 2, 2020 11:51 PM
Exit mobile version