फेसबुकचा डेटा पुन्हा एकदा चोरीला

फेसबुकचा डेटा पुन्हा एकदा चोरीला

प्रातिनिधिक फोटो

गेल्या बर्‍याच महिन्यांपासून फेसबुकवरील डेटा चोरीसाठी फेसबुक आपल्या युजर्ससाच्या प्रायव्हसीासाठी काहीच करू शकत नाहीये. बीबीसीने दिलेल्या एका अहवालानुसार, साधारणतः ८१ हजार युजर्सचे खासगी मेसेज हॅक झाले आहेत. हे अकाऊंट्स फक्त हॅकच झाले नाहीयेत तर या अकाऊंटमधील त्यांचे खासगी मेसेज विकण्यातदेखील येत असल्याची धक्कादायक गोष्ट घडत आहे. हॅकर्सने या अकाऊंट्सचा वापर जाहिरातींसाठी केल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान युजर्सचे खासगी मेसेज सार्वजनिक करण्यात आल्याचे सध्या समोर आले आहे.

काय म्हटलं आहे अहवालात?

अहवालात म्हटल्यानुसार, या अकाऊंट्समध्ये सर्वात जास्त युजर्सची संख्या ही युक्रेन आणि रूसमधील आहे. याशिवाय हॅक होणारी अकाऊंट्स ही अमेरिका, ब्रिटन आणि ब्राझीलमधील लोकांचीदेखील आहेत. डेटा चोरीला गेल्यानंतर ऑनलाईन एक जाहीरात देण्यात आली आहे ज्यामध्ये एका युजरच्या पूर्ण मेसेजच्या अ‍ॅक्सेससाठी केवळ ०.१० डॉलर अर्थात ७ रूपये २९ पैसे इतकी किंमत देण्यात येईल असं म्हटलं आहे. दरम्यान उदाहरणादाखल ८१ हजार लोकांचे मेसेज सार्वजनिकदेखील करण्यात आले आहेत. तर आता ही जाहीरात हटविण्यात आली आहे. तसंच बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सकडे सध्या साधारणतः १२० मिलियन फेसबुक युजर्सचा खासगी डेटा आहे आणि हॅकर केवळ ७ रूपये २९ पैसे इतक्या किमतीत ही माहिती विकण्याचा विचार करत आहे.

फेसबुकने नाकारले

बीबीसीने दिलेल्या या माहितीला फेसबुकने स्पष्ट नकार दिला आहे. अशा प्रकारचा कोणताही डेटा चोरीला गेला नसल्याचे फेसबुकने सांगितले आहे. मात्र फेसबुक युजर्सची खासगी माहिती डेटा व्हायरस एक्स्टेंशनवरून हॅकर्सपर्यंत पोहचल्याचे फेसबुकने मान्य केले आहे.

मेसेज सार्वजनिक झाल्याचे युजर्सचे म्हणणे

बीबीसीच्या रूसी कार्यालयाने ही बातमी खरी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी ज्या पाच लोकांचे खासगी मेसेज लीक झाले त्यांना संपर्क साधला. त्यावेळी या युजर्सने विकण्यात येत असलेले मेसेज आपलेच असल्याचे मान्य केले आहे. या मेसेजमध्ये केवळ टेक्स्टच नाही तर काही फोटोजदेखील होते. दरम्यान युजर्सचे खासगी मेसेजे मेलवायर वेबसाईट्स आणि ब्राऊजर एक्स्टेंशन्सवरून घेण्यात आल्याची शंकाही बीबीसीने आपल्या माहितीमध्ये व्यक्त केली होती.

First Published on: November 3, 2018 3:32 PM
Exit mobile version