बजेटमधला Realme C21Y स्मार्टफोन भारतात झाला लाँच; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

बजेटमधला Realme C21Y स्मार्टफोन भारतात झाला लाँच; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

Realme C21Y

Realme कंपनीने त्यांचा नवा आणि बजेटमधला Realme C21Y स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. नुकताच लाँच झालेल्या Realme C21Y स्मार्टफोनला 20:9 आस्पेक्ट रेशोचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासह हा स्मार्टफोन युजर्सना ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनला 5000mAh बॅटरी देण्यात आली असून रिव्हर्स चार्जिंग आणि सुपर पॉवर सेव्हिंग मोड देखील देण्यात आला आहे. Realme C21Y ची स्पर्धा Redmi 9, Infinix Hot 10S आणि Nokia G20 सारख्या स्मार्टफोनशी असल्याने कंपनी ग्राहकांना जे फीचर्स हवे तसे स्मार्टफोन तयार करताना दिसत आहे.

Realme C21Y स्मार्टफोनची किंमत 8 हजार 999 रूपये इतकी असून या परवडणाऱ्या किंमतीत 3 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज युजर्सना मिळणार आहे. तर 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 9 हजार 999 रूपये आहे. हा स्मार्टफोन युजर्सना क्रॉस ब्लॅक आणि क्रॉस ब्लू कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. Realme C21Y मध्ये Android 10 आधारित Realme UI देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनला 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असून ज्याचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर Unisoc T610 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU, 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.

Realme C21Y स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचे झाले तर या फोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सल, दुसरी लेन्स 2 मेगापिक्सल आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.


गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत, फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

First Published on: August 23, 2021 4:59 PM
Exit mobile version