आईशप्पथ! १० हजारात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला मोबाईल

आईशप्पथ! १० हजारात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला मोबाईल

१० हजारात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला मोबाईल

चांगल्या मेगापिक्सलचे कॅमरा असलेले मोबाईल फार महाग मिळतात. त्यामुळे इच्छा असूनही अनेक तरुण-तरुणी चांगल्या मेगा पिक्सलचे मोबाईल घेऊ शकत नाहीत. मात्र आता अशा तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला फक्त दहा हजारात ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा असलेला मोबाईल घेता येणार आहे. त्यामुळे फेसबुक, इन्स्टावर भारी क्वालिटीचे फोटो टाकणे तरुणांसाठी आता सहज शक्य होणार आहे. ‘रिअलमी’ या कंपनीने ४८ मेगापिक्सल असलेला कॅमेरा फोन मोबाईल बाजारात आणला आहे. हा मोबाईल २० ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. त्यामुळे आता कमी बजेटमध्येही तुम्हाला चांगला कॅमेरा क्वालिटीचा मोबाईल विकत घेता येणार आहे. Realme 5 Pro असे या मोबाईलचे नाव आहे. रिअलमीचे सीईओ माधव शेठ यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

माधव शेठ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘रिअलमीचा क्वाड कॅमेरा स्मार्टफोन हा जगातील पहिला क्वॉड कॅमेरा स्मार्टफोन असणार आहे. याशिवाय ४८ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा असलेला मोबाईल भारतात प्रथम फक्त १० हजारात मिळणार आहे. विशेष म्हणजे Realme 5 मोबाईल ८,९९९ रुपयांचा असणार आहे.’

काय आहेत Realme 5 चे विशेष फिचर्स?

– Realme 5 मध्ये 5,000mah बॅटरी बॅकअप असणार आहे.
– Realme 5 चा प्रायमरी कॅमेरा हा १६ मेगापिक्सलचा असणार आहे.
– प्रायमरी कॅमेराला सेंसर असणार आहे.
– ४ सेमीचे मॅक्रो लेन्स आणि डेफ्थ सेन्सर असणार आहे.

काय आहेत Realme 5 Pro चे फिचर्स?

– Realme 5 Pro मध्ये ४८ मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा असणार आहे.
– कॅमेरामध्ये Sony IMX586 sensor असणार आहे.
– याशिवाय जलद गतीने चार्ज व्हावे यासाठी 3.300 चे चार्जिंग सेटअप करण्यात आले आहे.


हेही वाचा – शाओमीन नंतर आता ओप्पोचा फ्लॅश सेल

First Published on: August 16, 2019 12:53 PM
Exit mobile version