Redmi 9 Power स्मार्टफोन लाँच; 48 MP कॅमेऱ्यासह मिळणार ‘हे’ फीचर्स

Redmi 9 Power स्मार्टफोन लाँच; 48 MP कॅमेऱ्यासह मिळणार ‘हे’ फीचर्स

Xiaomi कंपनी भारतीय बाजारात आज Redmi 9 Power स्मार्टफोन लाँच झाला आहे. कंपनीने यासंदर्भातील टीझर रिलीज करून या फोनचे काही भन्नाट फीचर्सविषयी माहिती दिली आहे. दरम्यान असे सांगितले जात आहे की, गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या Redmi Note 9 4G लाच Redmi 9 Power च्या नावाने लाँच करण्यात येणार आहे. मात्र चीनच्या मॉडलच्या तुलनेत इंडियन व्हर्जन थोडं वेगळे असणार आहे. Redmi 9 Power ला व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. या इव्हेंटची सुरूवात दुपारी 12 वाजता करण्यात आली आहे.

अशी आहे किंमत

Redmi Note 9 4G या स्मार्टफोनला चीनमध्ये 999 युआन म्हणजेच साधारण 11 हजार 300 रूपयांत लाँच करण्यात आला आहे. भारतात Redmi 9 Power या स्मार्टफोनची किंमत देखील साधारण अशीच असणार आहे.

जाणून घ्या, या स्मार्टफोनचे फीचर्स

Redmi Note 9 या स्मार्टफोनला 48 मेगा पिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासह त्याला फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीने या स्मार्टफोनचे कोणतेही अधिक डिटेल्स दिलेले नाही. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशनदेखील चीनमध्ये लॉंच करण्यात आलेल्या स्मार्टफोनप्रमाणेच असल्याचे सांगितले जात आहे.

Redmi 9 Power मध्ये 6.67 इंच फुल एचडी+ डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 662 प्रोसेसर आणि 18 वॅट फास्ट चार्जिंगसह 6000mAh ची बॅटरी देखील दिली जाणार आहे. दरम्यान, कॅमेऱ्याबद्दल सांगायचे झाले तर दोन्हीही फोन वेगवेगळे असणार आहे. या फोनमध्ये Redmi 9 Power मध्ये चार रिअर कॅमेरा मिळू शकतो. तर चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 9 4G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

First Published on: December 17, 2020 3:32 PM
Exit mobile version