‘रेडमी वाय ३’ च्या पहिल्या सेलमधील खरेदीवर ११२० जीबी डेटाची ऑफर

‘रेडमी वाय ३’ च्या पहिल्या सेलमधील खरेदीवर ११२० जीबी डेटाची ऑफर

रेडमी वाय ३

शाओमी ही चायनीझ स्मार्टफोन कंपनी आहे. या कंपनीचा सुपर सेल्फी स्मार्टफोन ‘Radmi y 3’ या स्मार्टफोनचा आज ३० एप्रिलला भारतामध्ये पहिला सेल आहे. भारततील ग्राहकांना आज ‘रेडमी वाय ३’ हा स्मार्टफोन विक्री होणार आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून हा स्मार्टफोनची विक्रीला सुरूवात झाली आहे. ग्राहकांना रेडमी वाय ३ हा स्मार्टफोन अॅमेझॉन, शाओमीच्या होम स्टोर्सवरून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.

स्मार्टफोनची फिचर्स आणि किंमत

‘रेडमी वाय ३’ हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी २ व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे. एक ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज, तर त्याची किंमत ९,९९९ रूपये आहे. तर दुसरा स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज, तर त्यांची किंमत ११,९९९ रूपये आहे. तसेच या फोनमध्ये स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. तर डॉट नॉच डिझाइनमध्ये ६.२६ इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले आहे. तसेच कॉमेऱ्याविषयी बालायचे झाले, तर स्मार्टफोनला सेल्फीसाठीचा कॉमेरा ३२ मेगापिक्सलचा आहे. तसेच एचडी सेल्फी व्हिडिओ रेकोर्डिंग करता येऊ शकणार आहे. १२ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल असा दोन कॉमेरे आहेत. तसेच या स्मार्टफोनची बॅटरीची क्षमता ४०००० एमएएच इतकी आहे. तर ही बॅटरी दोन दिवसापर्यंत चालणार असल्याचा शाओमी कंपनी दावा करत आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ डिस्प्लेला देण्यात आला आहे. ‘रेडमी वाय ३’ मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३२ प्रोसेसर आहे. फोनमध्ये डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्ड स्लॉटसह ट्रिपल कार्ड स्लॉट आहे.

First Published on: April 30, 2019 2:14 PM
Exit mobile version