लवकरच लाँच होणार Royal Enfield Himalayan; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

लवकरच लाँच होणार Royal Enfield Himalayan; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

लवकरच लाँच होणार Royal Enfield Himalayan

Royal Enfield लवकरच त्यांची नवी Royal Enfield Himalayan लाँच करणार आहे. Royal Enfield चे चाहत्यांसाठी ही खूशखबर असून Royal Enfield Himalayan लवकरत उपलब्ध होणार आहे. मात्र, कंपनीने आतापर्यंत या बाईकच्या लॉन्चिंग डेटची अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. असे असतानाही लॉन्चिंगच्या पूर्वी या बाईकची किंमत आणि फीचर्स लीक झाले आहेत. भारतात Royal Enfield ची क्लासिक बाईक सर्वाधिक प्रसिद्ध आहे. या बाईकच्या लॉन्चिंगच्या पूर्वीच या बाईकच्या कलर स्कीमसह काही डिटेल्सचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भारतात Royal Enfield ची क्लासिक बाईक्स भारतात सर्वाधिक पसंत केली जात असून तिचे चाहते देखील आहेत त्यामुळे कंपनी यासंदर्भातील त्यांचा पोर्टफोलिओ सतत अपडेट करत असते. जाणून घ्या, लॉन्चिंगच्या पूर्वीच चर्चेत असणाऱ्या Royal Enfield Himalayan ची किंमत आणि फीचर्स

सध्या रॉयल एनफील्ड हिमालयन बाईक्सची किंमत १.९२ ते १.९६ लाख रूपये असल्याचे सांगितले जात आहे. तर अपडेटेड मॉडेलची किंमत ८ हजार रूपयांपासून १० हजार रूपयांनी वाढणार आहे. मात्र वेबसाईटवर २ लाख ५१ हजार ५६५ रूपये किंमत असल्याचे सांगितले जात आहे.

असे आहेत फीचर्स

रॉयल एनफील्डच्या नव्या हिमालयन बाईकच्या उपलब्ध असलेल्या मॉडेलमध्ये BS6 कंप्लायंट 411cc चे सिंगल सिलेंडर, ४ स्ट्रोक, एअर कूल्ड इंजिन देखील देण्यात आलं आहे. या बाईकचे इंजिन 24.3bhp पॉवर आणि 32Nm चे पीक टॉर्क जेनरेट करते. या नव्या हिमालयन बाईकला ५ स्पीड कॉन्स्टंट मेश गियरबॉक्स देण्यात आला आहे. २०२०हिमालयन मोटरसाइकल, Classic ३५० ड्यूल-चॅनल ABS च्यानंतर BS६ एमिशन नॉर्म्सवर आधारलेली येणारी नवी बाईक रॉयल एनफील्ड असणार आहे.

First Published on: January 29, 2021 1:21 PM
Exit mobile version