सॅमसंगचा Galaxy A21s स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या दमदार फिचर्स

सॅमसंगचा Galaxy A21s स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या दमदार फिचर्स

सॅमसंगचा Galaxy A21s स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या दमदार फिचर्स

सॅमसंग कंपनीने आपला नवीन दमदार मिड बजेट रेंजचा स्मार्टफोन Galaxy A21s भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या काही दिवसापूर्वी जागतिक बाजारात लाँच केला होता. हा फोन पंच-होल डिस्प्ले पॅनल, क्वाड रियर कॅमेरा सेट-अप आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच केला गेला आहे. तसेच फोनमध्ये क्विक फेस रिकॉग्निशन फीचर आणि रियर माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर आहे. यावर्षी लाँच केलेला A51, A71 आणि A31 सारख्या Gen-Z फिरचरसह Galaxy A21s लाँच केला आहे.

गेल्या वर्षभरापासून सॅमसंग कंपनी चिनी स्मार्टफोन कंपनीना शाओमी, रिअलमी, ओपो, विवो यांना आव्हान देण्यासाठी बजेट आणि मिड बजेटच्या रेंजमध्ये Galaxy A आणि Galaxy M सीरिजचे स्मार्टफोन लाँच करत आहे. Samsung Galaxy A21s भारतात ऑनलाईन आणि ऑफलाईन चॅनल्सच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे. 4GB RAM + 64GB व्हेरिएंटची किंमत १६ हजार ४९९ रुपये तर 6GB RAM + 64GB व्हेरिअंटची किंमत १८ हजार ४९९ रुपये आहे.

या फोनमध्ये ६.५ इंच Infinity-O डिस्प्ले दिला आहे. फोनला पॉवर देण्याकरिता 5,000mAh बॅटरी दिली आहे. तसेच फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट फिचरसुद्धा दिले आहे. हा फोन तीन कलरमध्ये उपलब्ध आहे. ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट असे तीन कलर आहेत. याव्यतिरिक्त भारतात 4GB RAM + 64GB और 6GB RAM + 64GB या दोन स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनमधील इंटरनल स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB वाढता येऊ शकते. या फोनमध्ये सॅमसंग Exynos 850 चिपसेट प्रोसेसर वापरला आहे.

हा स्मार्टफोन अँड्रॉईल १० वर आधारित OneUI 2.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनच्या बॅकला क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये 48MP प्राइमरी सेंसर, 8MP अल्ट्रा वाइड कॅमरा, 2MP मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेंसर दिला आहे. तसेच सेल्फीसाठी 13MP पंच-होल कॅमेरा दिला आहे. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये अनलॉक आणि रियर माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसरचा वापर केला आहे. शिवाय यामध्ये ऑडियो क्वालिटीसाठी 3.5mm जॅक आणि Dolby Atmos फिचर दिला आहे.


हेही वाचा – १५ हजारपेक्षा कमी किंमतीत येतात हे उत्कृष्ट स्मार्टफोन


 

First Published on: June 17, 2020 2:58 PM
Exit mobile version