आला सॅमसंगचा गॅलेक्सी A9

आला सॅमसंगचा गॅलेक्सी A9

सॅमसंगचा गॅलेक्सी A9

आयफोन X मॅक्सनंतर आता अँड्रॉईडध्ये सॅमसंगचा नवा फोन भारतात नुकताच लॉन्च झाला आहे .  सॅमसंगचा गॅलेक्सी A9 हा स्मार्टफोन लॉन्चिंग सोहळा आज दिल्लीमध्ये पार पडला. या आधी हाच फोन ऑक्टोबर महिन्यात मलेशियामध्ये लॉन्च करण्यात आला. या फोनच्या फर्स्ट लूक नंतरच या फोनची उत्सुकता वाढली होती.आता फायनली हा फोन भारतात लॉन्च झाला आहे. त्यामुळे अनेकांनी आतापासूनच या फोनसाठी गुगलसर्च मोठया प्रमाणात सुरु केला आहेत.

काय आहेत फोनची वैशिष्ट्ये ?

A9 ची उत्सुकता असण्याचे सगळ्यात महत्वाचे कारण आहे ते म्हणजे या फोनचा कॅमेरा. या फोनला चार रेअर कॅमेरा असून हाच या फोनचा सेलिंग फॅक्टर असणार आहे, असा विश्वास सॅमसंगला आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या अँग्लने फोटोज या फोनमधून काढता येणार आहे. सध्या या फोनची जागतिक स्तरावरील किंमत ५९९ युरोज आहेत. भारतीय चलनानुसार हा फोन ४९ हजार १०० रुपयांना असून हीच किंमत भारतासाठी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

असा आहे सॅमसंगचा गॅलेक्सी A9

सॅमसंग गॅलेक्सी A9 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660S०C ही सिस्टीम आहे. या फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. 3800mAh बॅटरी असून या फोनमध्ये जलदगतीने फोन चार्ज करता येणार आहे. या फोनमध्ये दोन व्हेरिएंट असून 6 जीबी आणि 8जीबी रॅम असे दोन प्रकार असणार आहेत . कॅमेराचा या फोनचा usp असून २४ मेगापिक्सल कॅमेरा आहे. तर १० मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा असून 2x ऑप्टिकल झूम आहे. तर फ्रंट कॅमेरा २४ मेगापिक्सल सेन्सर कॅमेरा असून तो फेसलॉकला सपोर्ट करणारा आहे. या शिवाय फिंगरप्रिंट सेन्सरदेखील या फोनला आहेत. फोन ५१२ जीबी पर्यंत एक्सपांड करता येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचे यात अँड्रॉईड ८.० ओरिओ सिस्टीम असून हा फोन ड्युअल सीम आहे.

पाहा-

First Published on: November 20, 2018 1:57 PM
Exit mobile version