सोनीचा भन्नाट मोबाईल ‘प्रोजेक्टर’ !

सोनीचा भन्नाट मोबाईल ‘प्रोजेक्टर’ !

सौजन्य- सोशल मीडिया

मोबाईल किंवा लॅपटॉपवरील प्रेझेंटेशन मोठ्या पडद्यावर प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला प्रोजेक्टरची गरज असते. या कामासाठी विविध कंपन्यांचे प्रोजेक्टरही उपलब्ध असतात. मात्र, बरेचदा कामानिमित्त प्रवास करतेवेळी ते भलेमोठे प्रोजेक्टर्स सोबत घेऊन जाणं अवघड आणि जोखमीचं होऊन जातं. मात्र, आता ही समस्या नक्कीच दूर होणार आहे. गॅजेट निर्मीतीच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या सोनी कंपनीने एक नवीन भन्नाट गॅजेट लाँट केलं आहे. सोनी कंपनीने नुकतंच ‘एमपीसीडी १’ (Mpcd) हा मोबाईल प्रोजेक्टर लाँच केला आहे. विशेष म्हणजे आटोपशीर आकाराचा हा प्रोजेक्टर पोर्टेबल आहे. सोनीने इंडियन मार्केटमध्ये हा पोर्टेबल प्रोजेक्टर विक्रीसाठी लाँच केला असून, या छोट्याशा प्रोजेक्टरमध्ये अनेक उत्तम फीचर्स सामावलेले आहेत. दरम्यान या प्रोजेक्टरची किंमत २९ हजार ९९० रुपये असून, येत्या ३ ऑगस्टपासून तो विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

MP-CD1 प्रोजेक्टरचे फीचर्स

First Published on: July 22, 2018 4:39 PM
Exit mobile version