Telegram ॲपचा डाऊनलोडमध्ये नवा रेकॉर्ड, Whatsapp लाही टाकले मागे

Telegram ॲपचा डाऊनलोडमध्ये नवा रेकॉर्ड, Whatsapp लाही टाकले मागे

Telegram अॅपचा डाऊनलोडमध्ये नवा रेकॉर्ड, Whatsapp लाही टाकले मागे

Telegram या ॲपने जगभरात एक कोटीहून अधिक डाऊनलोडींगचा टप्पा पार करत नवा रेकॉर्ड बनवला आहे. एका रिपोर्टनुसार, Telegram ने एक कोटी डाऊनलोडींगचा टप्पा पार करत जगभरात आत्ताच्या लेटेस्ट ॲपमध्ये टॉप केले आहे. २०१३ मध्ये अस्तित्वात आलेल्या या इंस्टेंट मेसेजिंग ॲपने WhatsApp आणि Facebook मेसेजिंग ॲपलाही मागे टाकले आहे. WhatsApp ने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केल्याने युजर्समध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे Telegram सारख्या ॲपला बाजारात पकड निर्माण करण्यासाठी मोठे यश मिळाले.

टेलीग्रामने ग्रुप व्हिडिओ कॉल, ऑडिओ, स्क्रीन शेअरिंगससह अपडेटेड व्हॉईस चॅट असे नवे फिचर्स लाँच केले. यामुळे अनेक युजर्सला आकर्षत करण्यास मदत मिळाली. TechCrunch ने Sensor Tower च्या डेटाचा हवाला देत सांगितले की, गेल्या आठवड्यात जगभरात एक अब्ज लोकांनी Telegram डाउनलोड केले आहे. Telegram सह या यादीत WhatsApp, Messenger, Instagram, Snapchat, Spotify, आणि Netflix चाही समावेश आहे.

Telegram बाजारात एक मोठा प्रसिद्ध ॲप म्हणून उदयास आहे. एकट्या भारतात २२ टक्के लोकांना या ॲपला डाऊनलोड केले आहे. त्यामुळे भारत, रशिया आणि इंडोनेशिया या ॲपच्या दोन प्रमुख बाजारात बनल्या आहेत. जेथे १० ते ८ टक्के लोकांना हा ॲप डाऊनलोड केला आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, या ॲपवर महिन्याला ५० टक्के युजर्स ॲटिव्ह असतात. जागतिक स्तरावर सर्वाधिक डाउनलोड झालेला हा सातव्या क्रमांकाचा ॲप आहे. या ॲपने आत्तापर्यंत २.५ कोटी नवे युजर्स जोडले आहेत. सेन्सर टॉवर अहवालानुसार, जानेवारीमध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक डाऊनलोड झालेला हा ॲप ठरला आहे.


 

First Published on: August 31, 2021 6:26 PM
Exit mobile version