फेसबुक डाऊन झाल्यामुळे ‘हे’ App झाले मालामाल…

फेसबुक डाऊन झाल्यामुळे ‘हे’ App झाले मालामाल…

फोटो सौजन्य- businesstoday

साधारण आठवड्याभरापूर्वी ‘फेसबुक’ पोर्टलची सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होता. ज्यामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॅप वापरणाऱ्यांनाही काही काळासाठी समस्यांचा सामना करावा लागला होता. जवळपास ८ तास या तिनही सोशल प्लॅटफॉर्मची सेवा बंद होती. फेसबुकची सेवा डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ नव्हची. मात्र, एका खासही वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकसह अन्य दोन पोर्टलची सेवा बंद झाल्यामुळे टेलिग्राम या अॅपला चांगलाच फायदा झाला. वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, फेसबुक डाऊन झाल्यावर केवळ २४ तासात टेलिग्रामच्या युजर्सच्या संख्येत ३० लाखांनी वाढ झाली. टेलिग्राम हेदेखील फेसबुकप्रमाणेच एक चॅटिंग अॅप आहे. २०१८ च्या एका रिपोर्टनुसार, टेलिग्रामच्या अॅक्टिव्ह युझर्सची संख्या सुमारे २० कोटी इकती आहे.


धक्कादायक : फेसबुकवरुन केला ५० महिलांचा लैंगिक छळ

याबाबत बोलताना टेलिग्रामचे CEO पावेल ड्युरोव यांनी एका खासगी मुलाखतीत प्रतिक्रिया नोंदवली. ड्युरोव म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांमध्ये टेलिग्रामच्या युझर्समध्ये वाढ झाली हे नक्की आहे. रिपोर्टमधून तशी आकडेवारीही समोर आली आहे.’ मात्र, हे सांगतेवेळी युजर्समध्ये नेमकी का वाढ झाली? हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्यांच्या सांगण्यानुसार, फेसबुक डाऊन झाल्यानंतर जवळपास ३० लाख लोकांनी टेलिग्रामवर अकाउंट ओपन केले, जो निश्चीतच लक्षवेधी आकडा आहे.

 


वाचा : भारताच्या निवडणुकांवर फेसबुकची करडी नजर

 

First Published on: March 16, 2019 4:40 PM
Exit mobile version