TikTok युजर्सकरिता कंपनी करतेय ‘हा’ नवीन प्लॅन

TikTok युजर्सकरिता कंपनी करतेय ‘हा’ नवीन प्लॅन

टिक टॉक

भारतामध्ये टिक टॉक अॅप्लिकेशन हा अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे. तरूण पिढी या शॉर्ट व्हिडिओ अॅपच्या आहारी जात असल्याची तक्रार सतत येणाऱ्या तक्रारीमुळे या टिक टॉक अॅप्लिकेशनवर बंदी आणण्यात आली होती. एप्रिलमध्ये मद्रास उच्च न्यायालयाने या अॅपवर बंदी आणण्यास सांगितले. त्यानंतर गूगल प्ले स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोरवरून हे अॅप काढून टाकण्यात आले. तरी देखील TikTok ची लोकप्रियता कमी झालेली दिसत नाही.

मॉनेटायझेशन प्लॅनवर अधिक भर

गूगल प्ले स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोरवरून हे अॅप काढून टाकल्यानंतर १४ दिवसांनंतर पुन्हा डाउनलोडसाठी उपलब्ध करून देण्यात आले. मात्र कंपनी आता या लहान व्हिडिओ अॅप्लिकेशन टिक टॉक पुन्हा एकदा आपला मॉनेटायझेशन प्लॅनवर म्हणजेच पैसे कमाईवर लक्ष केंद्रित करत आहे.

काय आहे कपंनीचा प्लॅन

ही कंपनी अनेक कंपन्या, ब्रण्डसोबत पार्टनरशिप करत आहे. या संदर्भातील मॉनेटायझेशन प्लॅन सध्या प्राथमिक टप्प्यात असून अन्य काही कंपन्यांशी बोलणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या अॅपवर अनेक युजर्स लहान-लहान व्हिडिओ करून कंटेटची निर्मिती करतात. त्यामुळे या अॅपसह अनेक युजर्स जोडले गेले आहे. त्यामुळे येणार्या काही दिवसांत चांगले काहीतरी बदल टिक टॉक युजर्सना बघायला मिळणार आहे. त्याकरिता कंपनीकडून अभिनव मोहीम देखील राबविण्यात येत आहे.

First Published on: June 12, 2019 3:01 PM
Exit mobile version