TikTok ने फेसबुकला टाकलं मागे

TikTok ने फेसबुकला टाकलं मागे

भारतामध्ये टिक कॉक अॅप्लिकेशनवरून अनेकदा गदारोळ माजलेला आहे. तरूण पिढी या शॉर्ट व्हिडिओ अॅपच्या आहारी जात असल्याची तक्रार सतत होताना दिसतेय. अनेकांचा विरोध असला तरी TikTok ची लोकप्रियता काही कमी व्हायला मागत नाही. कारण वर्ष २०१९ च्या पहिल्या तिमाहीतील सर्वेनुसार टिकटॉकने फेसबुकसारक्या मोठ्या सोशल नेटवर्किंग साईटला मागे टाकल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान टिकटॉकचे जगभरातून १८ कोटी युजर्स वाढल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच अॅप इन्स्टॉल करण्याचे प्रमाण मागच्यावर्षीपेक्षा यावर्षी ७० टक्क्यांनी वाढले आहे. सेन्सॉर टॉवर या अप्लिकेशन एक्सपर्ट कंपनीने हा अहवाल प्रकाशित केला असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिली आहे.

यापैकी भारतात सर्वाधिक ४७ टक्के तर चीनमध्ये ७.५ टक्के डाऊनलोड करण्याचे प्रमाण राहिले आहे. मागच्या तिमाहीत भारतातून अंदाजे ८ कोटी युजर्सनी भारतात हे अॅप डाऊनलोड केले होते, तर हेच प्रमाण अमेरिकेत एक कोटी ३० लाख एवढे आहे. भारतात टिकटॉकचे एकून युजर्स आता २० कोटींच्या आसपास पोहोचले आहेत. महत्त्वाचा भाग म्हणजे टिक टॉक वाढण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या फेसबुकने सुद्धा मदत केलेली आहे. टिक टॉकची मालक असलेल्या कंपनीने डाऊनलोड्स वाढवण्यासाठी फेसबुक आणि इन्स्ट्राग्राम साईटवर जाहीरात दिली होती.

सेन्सॉर टॉवरचे प्रमुख रँडी नेल्सन म्हणतात की, टिकटॉक हे वेगळ्या स्वरुपाचे सोशल नेटवर्किंग अॅप आहे. त्यामुळेच याची प्रसिद्धी दिवसेंदिवस आहे. तर इंडस्ट्री ट्रॅकर्सचे म्हणणे आहे की, टिक टॉक हा शॉर्ट व्हिडिओ बनवण्याचे अॅप आहे. यामुळे कल्पकतेला धुमारे फुटतात. अनेक तरुण-तरुणी लोकांचे मनोरंजन करणारे व्हिडिओ बनवून प्रसिद्ध झाले आहेत. आता टिक टॉकने भारतातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

भारत हे टिक टॉकसाठी मोठे मार्केट आहे. त्यामुळे टिक टॉकला नेहमी अपडेट ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. टिक टॉकच्या युजर्सकडून नवनवीन सूचना मिळवून त्याद्वारे टिक टॉक आणखी सुरक्षित आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.- अशी प्रतिक्रिया टिक टॉकच्या प्रवक्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.

First Published on: May 17, 2019 10:12 AM
Exit mobile version