Truecaller चे नवे फीचर्स!

Truecaller चे नवे फीचर्स!

आता truecaller वर कोणीही शोधू शकणार नाही तुमचा नंबर; सेटिंगमध्ये करा 'हा' बदल

पूर्वी मोबाईलवर एखादा निनावी कॉल किंवा मेसेज आला, तर तो नंबर कोणाचा आहे हे शोधणं सहज शक्य व्हायचं नाही. मात्र, ‘ट्रू कॉलर’ हे अॅप लाँच झालं आणि हा प्रश्न चुटकीसारखा सुटला. तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसलेले नंबर तुम्ही सहज  ‘ट्रू कॉलर’च्या मदतीने सहज शोधू शकता. मात्र, नुकतंच ट्रू-कॉलर अॅपने हे एक नवं लोकोपयोगी फीचर लाँच केलं आहे. ट्रू कॉलरच्या माध्यमातून आता तुम्ही तुमचे कॉल रेकॉर्ड करु शकणार आहात. तुम्हाला आलेला कोणताही फोन मग तो सेव्ह नंबरवरुन असो अथवा निनावी तुम्ही रेकॉर्ड करु शकता. ट्रू कॉलरने कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर याविषयीची माहिती दिली आहे.

कॉल होणार सेव्ह

ट्रू कॉलरद्नवारे रेकॉर्ड करण्यात आलेले फोन आपोआप तुमच्या मोबाईल फोनमध्ये सेव्ह होतील. यामुळे एखादा महत्वाचा कॉल तुम्ही जतन करुन ठेवू शकता. पहिल्या १४ दिवसांसाठी युजर्स हे कॉल रेकॉर्डिंग फिचर विनामूल्य वापरु शकतात. मात्र, त्यानंतर हे फीचर वापरण्यासाठी निश्चित करुन दिलेली रक्कम भरावी लागेल.

ट्रूकॉलर अॅपचे कॉल रेकॉर्डिंग फिचर (प्रातिनिधिक फोटो)

युजर्सच्या प्रायव्हसीचा विचार 

‘ट्रू कॉलर’कडून हे खास फिचर लाँच करतेवेळी युजर्सच्या प्रायव्हसीचा पुरेपुर विचार करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही रेकॉर्ड केलेले कोणतेच कॉल कंपनीकडून रीड केले जाणार नाहीत. तसंच या प्रक्रियेमध्ये कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेपही केला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही रेकॉर्ड केलेले सर्व कॉल्स पूर्णत: गोपनीय राहतील. दरम्यान ट्रू कॉलरचं हे रेकॉर्डिंग फिचर फक्त अँड्रॉईड ५.० आणि त्यापुढील व्हर्जनमध्येच वापरता येणार आहे.

First Published on: July 14, 2018 3:38 PM
Exit mobile version