Twitter Down: शुक्रवारी मध्यरात्री ट्विटर झालं होतं डाऊन, १ तासांनी सुरळीत झाली सेवा

Twitter Down: शुक्रवारी मध्यरात्री ट्विटर झालं होतं डाऊन, १ तासांनी सुरळीत झाली सेवा

Twitter Down: शुक्रवारी मध्यरात्री ट्विटर झालं होतं डाऊन, १ तासांनी सुरळीत झाली सेवा

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर शुक्रवारी मध्यरात्री अचानक डाऊन झाले होते. ट्विटर सेवा पूर्णपणे डाऊन झाल्याने युझर्स हैराण झाले. भारत आणि अमेरिकेसह जगभरातील ट्विटर सेवा एक तासासाठी ठप्प झाली होती. तासाभरानंतर ट्विटरवरील आऊटेज कंपनीकडून काढून टाकण्यात आले. ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, एका बगमुळे ट्विटरसेवा ठप्प झाली होती. ट्विटर डाऊनमुळे युझर्सना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. शुक्रवारी मध्यरात्री ट्विटर सेवा अचानक ठप्प झाल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक तक्रारी येऊ लागल्या. डेस्कटॉप आणि अँप या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्विट एक्सेस होत नव्हते.

वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील टेक्निकल प्रॉब्लेमला ट्रॅक करणाऱ्या डाऊनडिटेक्टर डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री हजारो ट्विटर युझर्स ट्विट वापरू शकत नव्हते. शुक्रवारी रात्री ११ वाजल्यापासून ट्विटर काही पोस्ट होत नव्हते, अनेकांना ट्विटरवर रिप्लाय देखील देता येत नव्हता.

डाऊनडिटेक्टरच्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली, जयपूर, हैद्राबाद, चेन्नई सह भारतातील अनेक शहरांमध्ये युझर्सना ट्विटर वापरण्यात अडथळे येत होते. tweetDeck सारख्या काही सेवा युझर्ससाठी काम करत होत्या. अँप आणि वेबसाइटवर ट्विटर सेवा पूर्णपणे खंडित झाली होती.

२०२१मध्ये देखील अशाप्रकारे ट्विट सेवा खंडित झाली होती. तेव्हाही युझर्सना डायरेक्ट मेसेज पाठवता येत नव्हते. मोठ्या आऊटेजमुळे ट्विटर सेवा बंद झाली होती.


हेही वाचा – व्हॅलेंटाईन डे निमित्त WeMetOnTwitter हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड, व्हायरल होत आहेत फनी मिम्स

First Published on: February 12, 2022 1:57 PM
Exit mobile version