सावधान! तुम्ही Google Chrome वापरताय का? हे नक्की वाचा

सावधान! तुम्ही Google Chrome वापरताय का? हे नक्की वाचा

google chrome

जर तुम्ही वेब ब्राउझर गूगल क्रोममध्ये बरेच एक्स्टेन्शन वापरत आहात आणि ते एखाद्या विश्वसनीय कंपनीचे नसेल तर ते काढून टाका. कारण, हे थर्ड पार्टी एक्स्टेन्शन्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. Google Chrome वेब ब्राउझरवर हे एक्स्टेन्शन्स विनामूल्य उपलब्ध असतात. त्यापैकी बरेच जण असा दावा करतात की, तुम्ही ते एक्स्टेन्शन्स इन्स्टॉल केल्यास तुमचे ब्राउझिंग सुरक्षित असेल आणि तुम्ही हॅकिंगपासून वाचू शकतात, पण अहवालानुसार हे असे होत नसून धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.

जगभरात Google Chrome वेब ब्राउझरचे लाखो युजर्स आहेत. नुकतेच सायबर सिक्युरिटी फर्म अवेक सिक्युरिटीने एक खुलासा केला आहे. या फर्मनुसार, Google Chrome च्या एक्स्टेन्शन्सद्वारे युजर्सवर स्पायवेअर अॅटक होत आहेत. अर्थात, तुमच्यासाठी तुमची Google Chrome ची हिस्ट्री वैयक्तिक असते. दिवसभर तुम्ही कोण-कोणत्या वेबसाइट्स पहात आहात, त्याच्यावर नेमके काय पाहत आहात? आणि हे सगळं इतर कोणाला कळू नये, असे युजर्सला वाटत असते. मात्र हे समजणं म्हणजे स्पायवेअर अॅटक आहे, यामुळे युजर्सना अनेक धमक्यांना सामोरे जावे लागू शकते.

अहवालानुसार, Google Chrome ब्राउझरमध्ये वापरलेले एक्स्टेन्शन्स गोपनीयतेसाठी धोकादायक आहेत. हे विस्तार ३.२० दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहेत. Google Chrome मध्ये जगभरातील इतर वेब ब्राउझरच्या तुलनेत युजर्सची संख्या सर्वाधिक आहे. हा खुलासा देखील गंभीर आहे, कारण ते एक्स्टेन्शन्स मोफत आहेत आणि लोकप्रियही आहेत. सामान्यत: ते वेब ब्राउझरच्या गरजेसाठी वापरतात जेणेकरून ब्राउझ करणे सोपे होईल.

अशा विनामूल्य एक्स्टेन्शन्सद्वारे, हॅकर्स युजर्सचा संवेदनशील डेटा चोरतात. डार्क वेबवर विकून पैसे देखील मिळवले जातात. तसेच वैयक्तिकरित्या ते धोकादायकही असू शकते. यामध्ये आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या हॅकिंगपासून बँकिंग पर्यंतचा समावेश असू शकतो. यापूर्वीच, सुरक्षा संशोधकांनी Google ला माहिती दिली होती की, काही Chrome एक्स्टेन्शन्समुळे युजर्सच्या सुरक्षितता धोक्यात येत आहे. यानंतर गुगलने म्हटले की, कंपनीने अधिकृत क्रोम वेब स्टोअरमधून ७० अ‍ॅड्सद्खील काढून टाकल्या आहेत.


Realme X3 स्मार्टफोन २५ जूनला लाँच होणार; फ्लिपकार्टवरुन विक्री

First Published on: June 19, 2020 9:27 PM
Exit mobile version