विवो अॅपेक्सचा फिंगरप्रिंट सेन्सरचा नवा फोन

विवो अॅपेक्सचा फिंगरप्रिंट सेन्सरचा नवा फोन

विवो अॅपेक्स मोबाईल

चिनी मोबाईल कंपनी त्याचा नवा फ्युचर फोन विवो अॅपेक्स नावाने १२ जूनला लाँच करत असून, त्याचे टीझर रिलीज केले गेले आहे. या फोनची कन्सेप्ट मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१८ मध्ये सादर केली गेली होती. या फोनला ९१ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो दिला गेला आहे आणि फोनचा अर्धा स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर म्हणून वापरता येणार आहे.

या फोनला ५.९९ इंची अमोलेड स्क्रीन असून टीझरमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला सैद मेजर्स १.८ एमएमची तर बॉटम मेजर ४.३ एमएम आहे. स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर, असून फ्रंट कॅमेरा ८ एमपीचा एआय फिचरसह आहे. सेल्फी घेताना फोनच्या वरच्या भागातून पेरिरीस्कोपप्रमाणे वर येतो. रिअरला दोन कॅमेरे आहेत. या फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात साऊंड कास्टिंगचा वापर केला गेला आहे. त्यामुळे हा फोन डिस्प्लेच्या माध्यमातून व्हायब्रेशन देतो.

First Published on: May 26, 2018 4:58 AM
Exit mobile version