WhatsApp च्या नव्या अटी ‘या’ दिवसापर्यंत मान्य नसतील तर अकाऊंट होणार Delete!

WhatsApp च्या नव्या अटी ‘या’ दिवसापर्यंत मान्य नसतील तर अकाऊंट होणार Delete!

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातील सर्वाधिक युजर्स असणारे अॅप्लिकेशन म्हणजे WhatsApp त्याच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीमुळे चर्चेत आहे. जर WhatsApp युजर्सनी त्याच्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीच्या अटी मान्य केल्या नाही तर युजर्सचे अकाऊंट Delete होणार असल्याचे सांगितले जात आहे. जर युजर्सने या अटी आणि नियमांना मान्य केले तरच युजर्स WhatsApp वापरू शकतील अन्यथा त्यांना WhatsApp वर मॅसेज आणि कॉल करता येणार नाही. मात्र WhatsApp ने युजर्सना दिलासा दिला आहे. WhatsApp ने १५ मे महिन्याच्या पूर्वी त्यांच्या नव्या अटी स्वीकारल्या नाहीत तर युजर्सचे अकाऊंट डिलीट करण्याचा इशारा दिला आहे.

whatsApp च्या नव्या अटी मान्य न केल्यास १५ मे नंतर सुरूवातीला कोणताही मेसेज पाठवता येणार नाही तसेच कोणताही मेसेज युजर्सला येणार नाही. त्यामुळे whatsApp च्या नव्या प्रायव्हेट पॉलिसी मान्य नसतील तर हे अकाऊंट इनअॅक्टिव्ह दिसणार आहे तर १२० दिवसांनंतर हे अकाऊंट डिलीट करण्यात येणार आहे. WhatsApp च्या नव्या प्रायव्हेट पॉलिसीमुळे यापूर्वीच युजर्समध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र आता नव्या प्रायव्हेट पॉलिसीच्या अटी मान्य करण्यासाठी १५ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या नवीन पॉलिसीवर बर्‍याच युजर्संनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर युजर्संनी असे म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप आपली मूळ कंपनी फेसबुकसह डेटा शेअर करण्याचा विचार करीत आहे. मात्र व्हॉट्सअॅपने स्पष्टीकरण दिले की कंपनी कोणाचा डेटा शेअर करणार नाही. या नवीन पॉलिसीचा उद्देश व्यवसायिक उत्पन्न सक्षम करणं असा आहे.

whatsApp ने आधीपासूनच फेसबुकवर डिव्हाइसचा आयपी अॅड्रेस आणि प्लॅटफॉर्म विकत घेण्यासारखी माहिती शेअर केली आहे, परंतु युरोप किंवा यूकेमध्ये असे होत नाही कारण गोपनीयता कायदे वेगळे आहेत. whatsApp च्या सुरुवातीच्या घोषणेनंतर टेलिग्राम आणि सिग्नल सारख्या प्लॅटफॉर्मची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली कारण whatsApp युजर्सनी पर्यायी ‘एनक्रिप्टेड मेसेजिंग सिस्टम’ शोधण्यास सुरवात केली असल्याचे दिसतेय.

First Published on: February 23, 2021 3:49 PM
Exit mobile version