व्हॉट्सअॅप बिझनेसचे ४ महिन्यांत ३० लाख युजर्स, ६ देशांमध्ये प्रसार

व्हॉट्सअॅप बिझनेसचे ४ महिन्यांत ३० लाख युजर्स, ६ देशांमध्ये प्रसार

प्ले स्टोअरवरील व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप

जगभरात ३० लाख युजर्सकडून व्हॉट्सअॅप बिझनेस अॅप्लिकेशनचा वापर करण्यात येत असल्याचे फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी जाहीर केले आहे. सर्वसामान्य व्हॉट्सअॅप युजर्सच्या तुलनेत हे अॅप्लिकेशन यशस्वी ठरल्याचे झकरबर्गचे मत आहे. जगभरात सद्यस्थितीला व्हॉट्सअॅपचे १ अब्ज ५० कोटी वापरकर्ते आहेत. ६ देशांमध्ये व्हॉट्सअॅप बिझनेस वापरणाऱ्यांची आता अतिरिक्त भर एकूण व्हॉट्सअॅप युजर्समध्ये पडली आहे. भारत, इंडोनेशिया, इटली, मेक्सिको, ब्रिटन आणि अमेरिकेत हे अॅप्लिकेशन वापरले जाते.

व्हॉट्सअॅप बिझनेसचे फीचर

गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप बिझनेस उपलब्ध आहे. कंपन्यांना आपल्या ग्राहकांशी सहजपणे कनेक्ट होता यावे म्हणून व्हॉट्सअॅप बिझनेसची संकल्पना पुढे आली. चॅटिंगच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धिंगत करण्याची संकल्पना यानिमित्ताने वाढीस लागली. मात्र अॅपल फोनसाठी आय ट्युनवर हे अॅप्लिकेशन भारतात अजून उपलब्ध झालेले नाही.

व्हॉट्सअॅप बिझनेस विरुद्ध अॅपल बिझनेस

व्हॉट्सअॅप बिझनेसला सद्यस्थितीला अॅपल बिझनेस चॅटची तगडी स्पर्धा आहे. त्यासोबतच अँड्रॉईड आणि फेसबुक प्लॅटफॉर्मचे मॅसेंजरही या अॅप्लिकेशनशी स्पर्धा करतात. या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांसाठी आणि बिझनेस कनेक्ट करण्यासाठी चॅटची सुविधा दिली जाते.

बिझनेस इकोसिस्टीम

येत्या पाच वर्षांमध्ये बिझनेस इकोसिस्टीम तयार करण्यासाठी इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मॅसेंजर यासारख्या अॅप्लिकेशनचा वापर करण्यात येईल, असा विश्वास झकरबर्गने व्यक्त केला आहे. युजर्समार्फत जी पेजेस लाईक केली जातात, ज्या पेजेसवर युजर्स संवाद साधतात अशा पेजवर आर्थिक व्यवहार व्हावेत, असा आमचा उद्देश आहे. फेसबुक पेजेसचा उपयोग व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच व्यवहारासाठी व्हावा, हे उदिष्ट असल्याचे मत झुकरबर्गने मांडले आहे.

First Published on: April 28, 2018 2:24 PM
Exit mobile version