येतंय, व्हॉट्सअपचं आणखी एक नवं फिचर!

येतंय, व्हॉट्सअपचं आणखी एक नवं फिचर!

सोशल मीडियावर सर्वाधिक वापरले जाणारे चॅटिंग अॅपमध्ये व्हाट्सएप हे युजर्सच्या अधिक पसंतीचे आहे. भारतातील २०० दशलक्षांपेक्षा अधिक लोक सध्या व्हॉट्सअप वापरतात. त्वरीत संदेश देणारं हे अॅप युजर्सकरिता नेहमीच वेगवेगळे फिचर्स लॉंच करत असतं. फोटो मॅसेंजर या अॅपने ‘यूजर इंटरफेस’ (यूआई) च्या सहाय्याने ‘ऑडिओ पिकर’ हे वैशिष्ट्य सादर केला आहे. ज्यात युजरला एकाचवेळी ३० ऑडिओ फाईल्स पाठवता येणार आहे.

‘वेबईटीएइंफो’ने या आठवड्यात सांगितले की, ‘Whatsapp ने नुकतेच ‘ऑडिओ पिकर’ हे वैशिष्ट्य सादर केले आहे. यामध्ये, एखाद्या ऑडिओ पाठवण्यापुर्वी प्ले आणि एकापेक्षा अधिक ऑडिओ पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे.’ हे नवं फिचर व्हाट्सअपच्या २.१९.८९ बीटा अपडेटमध्ये आले आहे.

यापुर्वी, युजर्स एका वेळी फक्त एकच ऑडिओ पाठवू शकत होते. व्हाट्सअपच्या २.१९.८९ बीटा अपडेटमध्ये आलेल्या या नव्या फिचरमध्ये काही अपडेस दिसणार आहे. हे अॅप प्रसिद्ध ipad वर आधीपासून सपोर्टवर पहिलेपासून काम करत आहे. ज्याचा ‘टच आईडी सपोर्ट’, ‘स्प्लिट-स्क्रीन’ आणि ‘लैंडस्केप मोड’ सारखे फिचरकरिता परिक्षण सुरू आहे.

First Published on: April 10, 2019 5:55 PM
Exit mobile version