WhatsApp ने महिलांसाठी आणलं खास ‘बोल बहन’ चॅटबॉट, एका मॅसेजवर मिळणार आरोग्यासंबंधी माहिती

WhatsApp ने महिलांसाठी आणलं खास ‘बोल बहन’ चॅटबॉट, एका मॅसेजवर मिळणार आरोग्यासंबंधी माहिती

जगात अनेक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहेत. यात व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरलं जातं. चॅटिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच नवीन वैशिष्ट्ये अपडेट करत आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर मजेदार चॅटिंग पर्याय मिळत राहतील. WhatsApp ने यावेळेस महिलांसाठी खास अपडेट आणलं आहे.

यावेळी व्हॉट्सअॅपने आपल्या महिला वापरकर्त्यांना लक्षात घेऊन एक नवीन AI चॅटबॉट लाँच केला आहे. ‘बोल बहन’ नावाचे चॅटबॉट लाँच केले आहे. या चॅटबॉटमध्ये व्हॉट्सअॅपच्या महिला वापरकर्त्यांना किशोरावस्थेत होणारे शारीरिक बदल आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाणार आहेत.

व्हॉट्सअॅपने आपल्या महिला वापरकर्त्यांना हे वैशिष्ट्य देण्यासाठी गर्ल इफेक्टसोबत भागीदारी केली आहे. या चॅटबॉटची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की महिलांच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहितीसह, किशोरवयीन मुली सर्व प्रश्न विचारू शकतात, जे विचारण्यास त्या सहसा संकोच करतात किंवा लाजतात. या चॅटबॉटमध्ये किशोरवयीन मुली वेगवेगळ्या विषयांवर अनेक प्रश्न विचारू शकतात.

या क्रमांकावर सेवा उपलब्ध असेल

बोल बेहेन चॅटबॉट वापरण्यासाठी, व्हॉट्सअॅपच्या महिला वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवर +917304496601 या क्रमांकावर ‘हाय’ पाठवावे लागेल किंवा या लिंकवर क्लिक करावे लागेल (https://wa.me/917304496601).

 

First Published on: April 2, 2022 12:33 PM
Exit mobile version