मोबाईलमधील WhatsApp खूप स्टोरेज खातोय? मग हे नवीन फिचर तुमच्या कामाचं आहे

मोबाईलमधील WhatsApp खूप स्टोरेज खातोय? मग हे नवीन फिचर तुमच्या कामाचं आहे

व्हॉट्सअप मधील डेटा क्लिअर करण्यासाठी नवीन फिचर

आजकाल स्मार्टफोनमध्ये सर्वाधिक वापर असलेलं कोणतं App असेल तर ते आहे WhatsApp. मित्रांपासून ते ऑफिस आणि फॅमिली ग्रुपसाठी आज WhatsApp चॅटिंग App चा वापर होतो. टेक्स्ट मेसेंजिगमध्ये सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या App मध्ये WhatsApp चा समावेश होतो. मात्र फोटोज, व्हिडिओज आणि कॅच फाईल्समुळे WhatsApp आपल्या मोबाईलमधील बरीच जागा व्यापतो. त्यामुळे मोबाईलचे स्टोरेज फुल होते. WhatsApp ने आता स्टोरेज मॅनेजमेंट टूल नावाचे एक नवे फिचर लाँच केले आहे. याद्वारे युजर्स WhatsApp मधील जंक फाईल्स ओळखून त्या डिलीट करु शकतील. हे नवे फिचर याच आठवड्यात जगभरातील अँड्राईड आणि आयओएस युजर्सना उपलब्ध होणार आहे.

आज तक या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार WhatsApp बऱ्याच दिवसांपासून या टूलचे टेस्टिंग करत आहे. बीटा व्हर्जन असलेल्या काही युझर्सकडे हा पर्याय आधीपासूनच उपलब्ध झालेला होता. नव्या टूल्समुळे युजर्संना जंक फाईल्सची माहिती तात्काळ मिळू शकेल. त्यामुळे नको असलेल्या फाईल्स सिलेक्ट करुन डिलीट करता येऊ शकतात. तसेच कोणत्या फाईल्स जास्त स्पेस घेत आहेत, याचीही माहिती युजर्सला मिळू शकेल.

हे नवे फिचर तुम्हाला स्टोरेज अँड डेटा या पर्यायामध्ये गेल्यानंतर मॅनेज स्टोरेज या नावाने सापडेल. तसेच टॉपला एक नवा स्टोरेज बार देखील दिला आहे. WhatsApp ने किती जागा घेतली आहे, याचे आकडे वर दिसतील. तसेच स्टोरेज फुल झाल्यानंतर WhatsApp तुम्हाला अलर्ट देखील देऊ शकेल. त्यामुळे वेळोवेळी तुम्ही स्पेस क्लिअर करु शकता.

तुम्ही अनेकदा जे फोटो आणि व्हिडिओज फॉरवर्ड करता, मात्र ते देखील WhatsAppच्या स्टोरेजमध्ये दाखवले जात असते. या नव्या फिचरमुळे तुम्हाला त्या फाईल्स रिव्ह्यू करुन डिलीट करता येणार आहेत. इथे आणखी एक सेक्शन आहे, ज्याद्वारे तुम्हाला मोठ्या फाईल्स साईजसहीत दाखविल्या जातील. ग्रुप चॅट्स आणि फॉरवर्डेड मेसेजेसमुळे व्हॉट्सअपचे स्टोरेज मॅनेज करणे कठीण होत असते. मात्र या नव्या टूलमुळे युजर्सला स्टोरेज क्लिअर करणे सोपे होणार आहे.

First Published on: November 3, 2020 6:24 PM
Exit mobile version