WhatsApp चं भन्नाट फीचर! एकदा पाहिलेले MSG आपोआप होणार Delete

WhatsApp चं भन्नाट फीचर! एकदा पाहिलेले MSG आपोआप होणार Delete

इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप त्यांच्या युजर्ससाठी नेहमी नवनवीन फीचर्स लाँच करत असतं. नुकतंच व्हॉट्सअॅपने व्ह्यू वन (View Once) हे फीचर आपल्या युजर्ससाठी आणले आहे. या फीचरअंतर्गत, कोणताही व्हिडिओ किंवा फोटो युजर्स व्ह्यू वन मोड अंतर्गत पाठवू शकतात. या मोडद्वारे पाठवलेले कोणतेही फोटो आणि व्हिडिओ फक्त एकदाच शेअर केले जाऊ शकतात. एकदा फोटो ओपन केल्यानंतर, युजर्स तो पुन्हा पाहू शकणार नाहीत आणि ते इतरांना शेअर करू शकणार नाहीत. यासाठी कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती देणारं ट्विटही केले आहे.

व्हॉट्सअॅप हे नवं फीचर केवळ अँड्रॉइडसाठी लाँच करण्यात आले आहे. जर तुम्हालाही हे फिचर वापरायचे असेल तर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ते अपडेट करू शकतात. या नवीन फीचरसह, इन-अॅप मॅसेज नोटिफीकेशनची स्टाईल देखील बदलली आहे. जेव्हा तुम्ही हा फोटो किंवा व्हिडिओ पाहताच तुम्हाला त्या फोटोऐवजी Opened असा मॅसेज दिसेल आणि तो फोटो किंवा व्हिडिओ गायब होईल. जाणून घ्या तुम्ही हे फीचरचा वापर तुम्ही कसा करू शकतात.

व्हॉट्सअॅपवर फोटो-व्हिडीओ View Once द्वारे कसे पाठवायचे ते पहा

First Published on: August 4, 2021 4:47 PM
Exit mobile version