Alert! १ नोव्हेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमधील WhatsApp होणार बंद

Alert! १ नोव्हेंबरपासून ‘या’ स्मार्टफोनमधील WhatsApp होणार बंद

जु्न्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप आता सपोर्ट करणं बंद करत आहे. व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आलेले नवे फीचर आणि अपडेट्स जुने स्मार्टफोन आणि त्याचे सॉफ्टवेअर जुन्या स्मार्टफोनमध्ये सपोर्ट करत नसल्याने काही स्मार्टफोन मधील व्हॉट्सअॅप आता बंद होणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून कंपनी काही जुन्या स्मार्टफोनवरून व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद करत आहे. त्यामध्ये सॅमसंग आणि अॅपलचे स्मार्टफोन देखील आहेत. जर तुमच्याकडे यापैकी कोणताही स्मार्टफोन असेल आणि तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरणे सुरू ठेवायचे असेल, तर कदाचित आता तुम्हाला स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करावा लागणार आहे.

व्हॉट्सअॅपने त्यांचे सपोर्च पेड अपडेट केले आहे. कंपनीने व्हॉट्सअॅप वापरण्याच्या नवीन रिक्वायरमेंट्सबद्दल सांगितले आहे. कंपनीच्या मते, अँड्रॉइड 4.0.3 आइस्क्रीम सँडविच, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 वरून व्हॉट्सअॅपचे सपोर्ट बंद केले जाणार आहे. १ नोव्हेंबर २०२१ पासून या सॉफ्टवेअरवर चालणाऱ्या स्मार्टफोन आणि फीचर फोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही. मात्र व्हॉट्सअॅपने आपल्या FAQ पेजवर असे म्हटले की, अँड्रॉइड 4.1 आणि त्यावरील व्हॉट्सअॅपला सपोर्ट करणे सुरू राहणार आहे.

IOS 10 किंवा त्यावरील व्हर्जन असणाऱ्या iPhones मध्ये व्हॉट्सअॅप सुरू राहील. याशिवाय व्हॉट्सअॅप KaiOS 2.5.1 किंवा त्यावरील फीचर फोनमध्येही त्याचा सपोर्ट असणार आहे. म्हणजेच जिओफोन आणि जिओफोन 2 मध्ये व्हॉट्सअॅप काम करत राहील. जर तुम्ही फक्त जुन्या सॉफ्टवेअरवर स्मार्टफोन वापरत असाल तर त्यांना अपग्रेड करा. जर सॉफ्टवेअर अपडेट्स संपले असतील, तर तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागेल, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. जाणून घ्या कोणते स्मार्टफोन आहेत ज्यात व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार आहे.

या LG स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद

LG Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, Enact, Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus Nitro HD and 4X HD, and Optimus F3Q

या Huawei स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद

Huawei Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S and Ascend D2

Sony आणि या इतर कंपन्यांच्या या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार

Sony Xperia Miro, Sony Xperia Neo L, and Xperia Arc S, Alcatel One Touch Evo 7, Archos 53 Platinum, HTC Desire 500, Caterpillar Cat B15, Wiko Cink Five, Wiko Darknight, Lenovo A820, UMi X2, Faea F1, and THL W8

First Published on: September 7, 2021 3:58 PM
Exit mobile version