आता एकाचवेळी ४ फोनमध्ये वापरा Whatsapp! जाणून घ्या या नव्या फीचर्सविषयी

आता एकाचवेळी ४ फोनमध्ये वापरा Whatsapp! जाणून घ्या या नव्या फीचर्सविषयी

WhatsApp

सर्व सोशल मीडिया अॅप्लिकेशनपैकी सर्वाधिक युजर्स असणारे सोशल मीडिया अॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअप. व्हॉट्सअप नेहमीच त्यांच्या युजर्सना नव नवीन फीचर्स देत असतात. यंदाही व्हॉट्सअपने अशाच एका भन्नाच फीचरची घोषणा केली आहे. हे फीचर म्हणजे एकाचवेळी अनेक फोन्समधून व्हॉट्सअपचा वापर करता येणे. परंतु, आता कंपनीने आपल्या युजर्सला नेमकं काय हवं हे ओळखून व्हाट्सअ‍ॅपने नव्या फीचरची घोषणा केली असून कंपनी लवकरच Multi Device Support घेऊन येईल. त्याचबरोबर Disappearing Mode आणि View Once हे फीचर देखील व्हॉट्सअपमध्ये समाविष्ट असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप नवीन मल्टी-डिव्हाइस फीचरची चाचणी घेत आहे. असे सांगितले जात आहे की, हे व्हॉट्सअ‍ॅप फीचर यंदाचे सर्वात मोठे फीचर असेल. या फीचरसह तुम्ही एकाहून अधिक डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअॅप अकाऊंट चालवू शकता. यापूर्वीही अशी बातमी होती की, व्हॉट्सअॅप मल्टी-डिव्हाइस सपोर्टवर काम करत आहे. मात्र आता या संदर्भात फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माहिती दिली आहे. मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचरची चाचणी घेण्यात येत आहे आणि लवकरच हे फीचर प्रसिद्ध केले जाईल, असे मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.

तसेच व्हाट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचर्सची माहिती WABetaInfo वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. या वेबसाइटने WhatsApp CEO Will Cathcart यांच्यासोबत संवाद साधला होता तेव्हा या आगामी फीचर्सची माहिती समोर आली. कंपनीच्या सीईओनी सांगितले कि, व्हाट्सअ‍ॅप Multi Device Support, Disappearing Mode आणि View Once हे फीचर लवकरच रोलआउट केले जातील. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरसह तुम्ही एकाच वेळी आपले अकाऊंट चार फोनसह कनेक्ट करू शकतात. मुख्य डिव्हाइस कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय नसतानाही तुम्ही या इतर डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप सुरू ठेऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार युजर त्यांचे व्हाट्सअ‍ॅप अकाऊंट एकाचवेळी ४ फोन्समध्ये वापरू शकतील. यापूर्वी एका स्मार्टफोनमधील व्हाट्सअ‍ॅप नंबरने दुसऱ्या फोनमध्ये लॉगिन केल्यावर जुन्या फोनवरील अकाऊंट बंद होत असे. मात्र आता ते शक्य होणार आहे. व्हाट्सअ‍ॅप व्यू वन्स फीचर देखील लवकरच रोलआउट होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

 

First Published on: June 4, 2021 3:31 PM
Exit mobile version