व्हॉट्सअॅप करणार आयफोन युजर्सना फेक न्यूजपासून सावध

व्हॉट्सअॅप करणार आयफोन युजर्सना फेक न्यूजपासून सावध

(फोटो प्रातिनिधिक आहे)

युजर्सला काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्हॉट्सअॅपने आता आयफोन युजर्ससकरता एक नवीन फिचर आणले आहे. यामध्ये आता व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजमध्ये आलेली एखादी मीडिया फाईल आयफोन युजर्सना सोप्या पद्धतीने पाहता येणार आहे. त्याचबरोबर या फिचर्समुळे मेसेजमध्ये पाठवलेली फेक न्यूज देखील सहजरीत्या कळणार आहे.

काय आहे हे नवीन फिचर्स?

या फिचर्समध्ये मेसेजचं नोटिफिकेशन येणार. या नोटिफिकेशनद्वारे मीडिया फाईल्स पाहता येणार आहे. या फिचर्समुळे व्हॉट्सअॅप मेसेजवरुन येणारी फाईल फेक असल्याचे देखील कळणार आहे. जर ती लिंक संशयास्पद असल्यास त्यालिंकवर स्पष्ट शब्दात ‘संशयास्पद लिंक’ असे लिहून येणार आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅपवर वाऱ्याच्या वेगाने पसरणाऱ्या फेक मेसेजना आळा बसणार आहे.

व्हॉट्सअॅपच्या युजर इंटरफेसमध्येही होणार बदल

व्हॉट्सअॅपच्या या नवीन फिचर्समुळे व्हॉट्सअॅपच्या युजर इंटरफेसमध्येही बदल करण्यात आले आहेत. या नव्या फिचरमध्ये अशाच प्रकारे GIF चं प्रिव्हूदेखील दिसणार आहेत.

कोणाला मिळणार हे नवीन फिचर्स

व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचर्सचा आयओएस ७, आयफोन ४ आणि त्यापुढील व्हर्जनवर चालणाऱ्या मोबाईलसाठी फायदा होणार आहे. मात्र या नवीन फिचर्सकरता अँड्रॉइड युजर्सना थोडे थांबावे लागणार आहे. अँड्रॉइड युजर्सकरता हे फिचर कधी येणार हे अद्याप सांगता येत नसल्याचे समोर आले आहे.

First Published on: September 5, 2018 10:36 PM
Exit mobile version