ट्विटर झाले डाऊन; नेटकरी झाले हैराण

ट्विटर झाले डाऊन; नेटकरी झाले हैराण

जगाभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया अॅप्लिकेशनमध्ये ट्विटर वापरणाऱ्यांची संख्या देखील सर्वांधिक आहे. जगभरात वापरल्या जाणाऱ्या ट्विटर सेवा ठप्प झाल्याने अनेक नेटकरी हैराण झाले आहेत. बुधवारी सकाळच्या वेळात सर्वाधिक वापरली जाणारी मायक्रोब्लॉगिंग साइट काही तासांकरिता डाऊन झाल्याने अनेक युजर्सने वैतागून तक्रार देखील केली आहे. अनेक युजर्सने तक्रार केल्यानंतर ट्विटरने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत युजर्सच्या तक्रारीनंतर येणाऱ्या अडचणींची माहिती दिली आहे.

ट्विटर डाऊन असल्याच्या साधारण चार हजारांहून अधिक तक्रारी भारतासह जपान, कॅनडा यांसारख्या देशातील युजर्सकडून ट्विटरकडे आल्या आहेत. ट्विटरच्या डॅसबोर्ड मॅनेजमेंट अॅप असलेल्या ट्विटडेस्कने भारतील काही ठिकाणांसह जगभरात अनेक ठिकाणी या समस्येवर काम सुरू केले असल्याची माहिती हाती आली आहे. याबाबत आलेल्या माहितीनुसार, ट्वीटडेस्क उत्तर आणि दक्षिण अमेरिका, यूरोप आणि आशिया-प्रशांत क्षेत्रातील अनेक देशांमध्ये ट्विटरची सेवा ठप्प झाली होती.

तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील युजर्सनां ट्विट करताना अडचणी येत आहेत. ही समस्या निवारण्याचं काम सुरू असल्याची माहिती ट्विटरने दिली. काही वेळात ही सेवा पूर्ववत होईल, असे कंपनीने सांगत असुविधेसाठी ट्विटरच्या माध्यमातून दिलगीरी व्यक्त केली आहे.

First Published on: October 2, 2019 2:58 PM
Exit mobile version