तंग आ गये इस सोशल मीडिया के अॅड से!!

तंग आ गये इस सोशल मीडिया के अॅड से!!

(फोटो प्रातिनिधीक आहे.)

अरे यार, सोशल मीडियावरच्या जाहिरातींनी डोकं उठवलंय पार!! डोक्याला ताप करून ठेवलाय!! कोणतीही साईट उघड जाहिरात सुरू. अशा तक्रारी आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कोणतीही वस्तु ‘गुगल’ केल्यानंतर तुमचा IP अॅड्रेस शोधून तुमच्या नजरेसमोर ती वस्तु सतत आणण्यामध्ये सोशल मीडिया माहिर. पण युजर्सना मात्र त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. अमेरिकेमध्ये या जाहिरातबाजीला कंटाळून एका महिलेनं थेट फेसबुककडे नाराजीचा सूर लावत तक्रार केली. त्यावर फेसबुकनं देखील खेद व्यक्त केला.

काय आहे प्रकरण

गरोदर असणाऱ्या एका महिलेनं #30weekspregnant, #babybump शब्द वापरत फेसबुकवर पोस्ट केली. त्यानंतर ती महिला गरोदरपणासाठी रूग्णालयामध्ये दाखल झाली. पण दुर्दैवानं तिचं मुल दगावलं आणि महिलेवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून सावरत जेव्हा ही महिला सोशल नेटवर्कींग साइटवर गेली, तेव्हा तिला सतत नवजात मुलांच्या वस्तुंची जाहिरात दिसू लागली. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामनं तर या जाहिरातींचा एवढा भडीमार केला की, संबंधित महिलेला राग अनावर झाला. त्यानंतर तिनं थेट फेसबुककडं तक्रार दाखल केली. फेसबुकनं देखील तक्रारीची दखल घेत माफी मागितली. खेद व्यक्त केला. शिवाय, ही जाहिरातबाजी फेसबुकनं नाही तर संबंधित कंपनीनं केली असल्याचं सांगितलं. आता यावरच न थांबता संबंधित महिलेला मुल कसं दत्तक घ्याल याची जाहिरात येऊ लागली.

असे बरे वाईट अनुभन तुम्हाला देखील आले असतील. त्यामुळे ‘गुगल’ करताना काळजी घ्या! शेवटी ते म्हणतात ना दुनियामे सब बेचता है सिर्फ बेचने वाला चाहिए!! त्यातील हा मार्केटिंगचा प्रकार. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटवर थोडं जपून, बरं का!!

First Published on: December 13, 2018 3:57 PM
Exit mobile version