शाओमीचा रेडमी नोट ६ बाजारात दाखल

शाओमीचा रेडमी नोट ६ बाजारात दाखल

(फोटो प्रातिनिधिक आहे)

भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड असलेल्या शाओमीचा रेडमी नोटच्या सिरीजमध्ये ‘रेडमी नोट ६ प्रो’ नुकताच चीनमध्ये लाँच केला गेला. आता लवकरच तो भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्याच वर्षी बाजारात आलेल्या शाओमीच्या रेडमी नोट ५ प्रो या फोनला भारतीय ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे हा फोन देखील मोबाईल युजर्सचे आकर्षण ठरणार आहे.

(फोटो प्रातिनिधिक आहे)

कमी किंमत आणि भन्नाट फीचर्स

शाओमीच्या फोन्सची खासियत म्हणजे कमी किंमतीत आणि भन्नाट फीचर्स मिळतात. आपली हीच खासियत त्यांनी रेडमी ६ प्रो मध्ये सुद्धा कायम ठेवली आहे. आयफोन १० असणारा ‘नॉच‘ हे रेडमी नोट ६ प्रो चे मुख्य वैशिष्ट्य असून त्याचसोबत ५.८४ इंच डिस्प्लेसोबत १९:९ (पूर्ण एचडी स्क्रीन) रेशो, ड्युअल रिअर कॅमेरा (१२ आणि ५ मेगापिक्सल), ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ६२५ ऑक्टाकोर प्रोसेसर, ४ हजार एमएच बॅटरी, डेडीकेटेड सिम स्लॉट, मेमरी कार्ड (२५६ जीबी पर्यंत) अशी या मोबाईलची मुख्य फीचर्स आहेत.

(फोटोग प्रातिनिधिक आहे)

विवध रंगात उपलब्ध

शाओमीने चीनमध्ये रेडमी नोट ६ प्रोचे दोन प्रकार लाँच केले आहेत. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी तसेच ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल अशा दोन मॉडेलची किंमत अनुक्रमे १० हजार ४०० आणि १३ हजार ६०९ आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू, गोल्ड, रेड, पिंक या रंगातही उपलब्ध आहे.

First Published on: June 29, 2018 2:26 PM
Exit mobile version