आता Redmi 8 खरेदी करू शकता फक्त २९९ रूपयात!

आता Redmi 8 खरेदी करू शकता फक्त २९९ रूपयात!

स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi ने ५ हजार एमएच बॅटरी असणारा रेडमी ८ हा स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची किंमत ७ हजार ९९९ रूपये इतकी होती. हा फोन रेडमी ७ चा अपग्रेडेड व्हेरिएंट फोन असून भारतीय बाजारात या फोनची स्पर्धा Realme 5 आणि Samsung Galaxy M20 शी असणार आहे. या स्मार्टफोनचा सेल आज दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार असून ई-कॉमर्सच्या तसेच कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असणार आहे.

अशी असेल Redmi 8 किंमत

या फोनच्या दोन्ही व्हेरिएंटला खरेदी करता येऊ शकते. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असणारा फोन ७ हजार ९९९ रूपयात तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणारा फोन ८ हजार ९९९ रूपयांत खरेदी करता येणार आहे. असे दोन्ही व्हेरिएंटचे फोन एमेरल्ड ग्रीन, ऑनिक्स ब्लॅक, रूबी रेड आणि सैफायर ब्लू रंगात उपलब्ध आहेत.

असा खरेदी करता येणार फक्त २९९ रूपयात फोन

सेल सुरू झाल्यावर ग्राहकांना हा फोन खरेदी करताना Flipkart Axis Bank Buzz Credit Card चा वापर करून खरेदी केला तर ५ टक्के सवलत मिळू शकते. तसेच हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर ही खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय ७ हजार ७०० रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. ही एक्सेंज किंमत मिळाल्यानंतर ग्राहकांना हा फोन २९९ रूपयांत खऱेदी करता येणार आहे.

असे आहेत Redmi 8 चे वैशिष्ट्य

First Published on: November 14, 2019 1:08 PM
Exit mobile version