Xiaomi लाँच करणार Mi9

Xiaomi लाँच करणार Mi9

शाओमी Mi9

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने नोव्हेंबरच्या सुरुवातीला Mi8 लाँच केल्यानंतर आता एक नवा फोन कंपनी लाँच करणार आहे. शाओमी Mi9 या नव्या फोनच्या लाँचसाठी काम करत आहे. शाओमी Mi8 हा अफोर्डेबल फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. त्यामुळे या फोनला जास्त मागणी आहे. त्यामुळे या नव्या शाओमी Mi9 मध्ये काही खास फिचर्स असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच हा फोन तयार होऊन बाजारामध्ये उतरवण्याची तयारी शाओमी करत असल्याचं समजत आहे.

६.३ इंच डिस्प्ले असण्याची शक्यता

या नव्या शाओमी Mi9 मध्ये क्वालकॅम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर असू शकतो. तसंच या फोनमध्ये ८ जीबी रॅमसह अंतर्गत मेमरी २५६ जीबी अथवा ५१२ जीबी असेल असंही म्हटलं जात आहे. त्याशिवाय Mi Mix 3 प्रमाणे या फोनमध्ये १० जीबी रॅम असण्याची शक्यताही आहे. फोनमध्ये ६.३ इंचाच्या AMOLED डिस्प्लेबरोबर एक लहान नॉच असेल. तसंच फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सरदेखील देण्यात येणार आहे.

२५६ जीबी वा ५१२ जीबी रॅम

शाओमीचा नवा फोन हा अपकमिंग स्नॅपड्रॅगन ८१५० चिपसेटवर काम करू शकणार आहे. काही अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे की, ६ जीबी, ८ जीबी आणि १० जीबी असे तीन व्हेरिअंट असतील. यामधील अंतर्गत मेमरी २५६ जीबी अथवा ५१२ जीबी असू शकते. तसंच नव्या फोनचा कॅमेराही खास असण्याचं म्हटलं जात आहे. शाओमी Mi9 मध्ये तीन कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे, पहिल्या दोन कॅमेरामध्ये फ्लॅशची सोय करण्यात आली आहे. तर या ट्रीपल कॅमेरा सेटअप मध्ये ४८ एमपी, १३ एमपी आणि १६ एमपी असे कॅमेरा लावण्यात येणार आहेत. फोन ५ जी सपोर्टसह असेल. तर याची बॅटरी ४००० एमएएच इतकी पॉवरफुल असेल. बॅटरीमध्ये क्विक चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. दरम्यान या फोनची किंमत किती असेल याची माहिती मिळालेली नाही.

First Published on: November 15, 2018 7:20 PM
Exit mobile version