YouTube Premiumचा वार्षिक प्लान भारतात लाँच, Ad free videos पाहण्यासाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे

YouTube Premiumचा वार्षिक प्लान भारतात लाँच,  Ad free videos पाहण्यासाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे

YouTube खात्याची कमाई करण्यासाठी, 500 सबस्क्राईबर्स असणं आवश्यक आहे

YouTube Premium आणि YouTube Music Premiumने भारतात वर्षभराचा प्लान लाँच केला आहे. ज्यात 1 आणि 3 महिन्यांसाठी YouTubeचे पेड सब्स्क्रिप्शन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एक वर्षाच्या प्लानमध्ये एड फ्री व्हिडीओज पाहता येणार आहेत. यूट्यूब प्रिमियर आणि यूट्यूब म्युझिक प्रिमियरचा हा नवीन प्लान भारत आणि अमेरिकेसह इतर देशांमध्ये देखील लाँच करण्यात आला आहे. यूट्यूबने त्यांच्या वार्षिक प्लानमध्ये युझर्ससाठी काही स्पेशल डिस्काऊंट ऑफर देखील दिल्या आहेत.

यूझर्स यूट्यूबचा वार्षिक प्लान एंड्राइड डिव्हाइज किंवा वेबवरुन देखील सब्स्क्राइब करू शकता. 9to5Googleच्या रिपोर्टनुसार, हा प्लान इंडिविज्युअल यूझर्ससाठी ही उपलब्ध होणार असेल. त्यामुळे स्टूड्सना या प्लानचा वापर करता येणार नाहीये.

यूट्यूबने या प्लानसाठी एक प्रमोशनल ऑफर जारी केली आहे. या ऑफरमध्ये 23 जानेवारीपर्यंत वार्षिक प्लानवर युझर्सना डिस्काऊंट मिळू शकतो. ऑफरमध्ये YouTube Premiumचा प्लान युझर्सना 1,159 रुपयांना मिळणार आहे. तर YouTube Music Premiumचा वार्षिक प्लान 889 रुपयांना मिळणार आहे.

तुम्हाला जर या ऑफरचा आनंद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या. कारण ऑफर संपल्यानंतर युझर्सना  सब्सक्रिप्शनसाठी  किती रुपये मोजावे लागतील याबाबत कंपनीकडून कोणती माहिती देण्यात आलेली नाही. YouTube Premiumचा सर्वसाधारण सध्याचा महिन्याचा प्लान हा 129 रुपयांना उपलब्ध आहे. तर YouTube Music Premiumचा महिन्याचा प्लान 99 रुपयांना उपलब्ध आहे.

यूट्यूबच्या सपोर्ट पेजनुसार, यूट्यूबचा वार्षिक प्लान भारत, ब्राझील,कॅनडा, जर्मनी,जपान,रशिया, थायलँड,तुर्की आणि अमेरिकेत लाइव्ह करण्यात आला. YouTube Premium आणि YouTube Music Premium चे जुने सब्स्क्राबर्स त्यांचा जुना प्लान रद्द करुन नवा वार्षिक प्लान घेऊ शकतात.

 

First Published on: January 20, 2022 12:52 PM
Exit mobile version