ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पार्किंग प्लाझा रुग्णालयातील २६ रुग्ण केले स्थलांतरित

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पार्किंग प्लाझा रुग्णालयातील २६ रुग्ण केले स्थलांतरित

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पार्किंग प्लाझा रुग्णालयातील २६ रुग्ण केले स्थलांतरित

राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. ठाण्यात रोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या पार गेल्याने ठाण्यातील आरोग्यसेवा ढासळलेली आहे. शनिवारी तर या ढिसाळ कारभाराचा प्रकार उघडकीस आला. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाजवळ ठाणे पालिकेने कोटयावधी रुपये खर्च करून एक हजार बेड्चे नवे रुग्णालय सुरु केले. शनिवारी या रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठाच संपल्याने मोठी खळबळ उडाली. तर रुग्णालयातील २६ रुग्ण यांचे तातडीने स्थलांतर करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढावली आहे. रुग्णालय प्रमुखांच्या वेळे अगोदरच लक्षात आल्याने अनर्थ टळला.

ठाण्यात नव्याने उभारण्यात आलेल्या ग्लोबल रुग्णालयास रुग्णांची वाढती संख्या पाहून ज्युपिटर रुग्णालय जवळ असलेले पार्किंग प्लाझा रुग्णालय नुकतेच सुरु करण्यात आले. हे रुग्णालय देखील पूर्ण भरलेले होते. मात्र पार्किंग प्लाझा रुग्णालय मात्र सुविधेपासून वंचित राहिले. दुसरीकडे रुग्णालयात अनेक रुग्ण हे ऑक्सिजन बेडवरील आहे. मात्र ऑक्सिजन संपत आल्याने शनिवारी एकाच खळबळ उडाली. ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या तब्बल २६ रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे बाळकूम येथील ग्लोबल रुग्णालयात स्थलांतरित करण्याची कसरत करण्यात आली. ठाण्यात मोठ्या प्रमाणात कोव्हीड रुग्णालये आहेत. त्यात ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा हि पालिकेची एक हजार बेड क्षमतेचे रुग्णालय आहेत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणे हे गरजेचे आहे. मात्र शनिवारी पार्किंग प्लाझा रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली. तब्बल २६ रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचाहर घेत होते. मात्र ऑक्सिजन संपल्याने या रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिकेतून ग्लोबल स्थलांतरित करण्याची धावपळ सुरु झाली.

ठाण्यात कोव्हीड रुग्णालये असून त्यांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक आहे. मात्र शनिवारी ऑक्सिजन साठा  संपण्याच्या मार्गावर असल्याने आणि ऑक्सिजन साठा २ तासांनी उपलब्ध होणार असल्याने पार्किंग प्लाझा रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा व्हावा आणि त्यांच्या उपचारात  कुठलीही बाधा येऊ नये म्हणून २६ रुग्ण स्थलांतरित करण्यात आलेली आहेत.  असे
ठाणे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख म्हणाले.

First Published on: April 10, 2021 9:21 PM
Exit mobile version