ठाण्यात अग्नितांडव; कार्यालयाला लागलेल्या आगीचे लोळ हवेत

ठाण्यात अग्नितांडव; कार्यालयाला लागलेल्या आगीचे लोळ हवेत

ठाणे पश्चिमेतील पोखरण क्र. १ वरील सौ. सुलोचना सिंघानिया शाळेजवळील रेमण्ड कंपनीच्या कार्यालयाल भीषण आग लागल्याची घटना आज, बुधवारी पहाटे घडली. आगीची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधिकार, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी ४ अग्निशमन दलाच्या गाड्या, २ बचाव कार्याच्या गाड्या, ३ पाण्याचे टँकर, २ पाण्याचे जम्बो टँकर, पोलीस अधिकारी तसेच डिजास्टर मॅनेजमेंटचे स्थानिक अधिकारी उपस्थित आहेत.

 

First Published on: September 30, 2020 8:37 AM
Exit mobile version