ठाण्यातील अभिनय कट्टयाची दशक पूर्ती 

ठाण्यातील अभिनय कट्टयाची दशक पूर्ती 

ठाण्याचा सांस्कृतिक चेहरा किंवा कलाकारांची पांढरी म्हणून ओळखला जाणारा अभिनय कट्टा हा २७ फेब्रुवारी २०२१ ला दहा वर्षांचा झाला. २७ फेब्रुवारी २०११ रोजी मराठी भाषा गौरवादिनानिमित सुरू झालेला हा कट्टा अविरत पणे कुठे ही खंड न पडता दर रविवार सुरू राहिला. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी कट्टयाच्या दशक पूर्ती निमित्त रंगमंचाची पूजा कट्टयाचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी अभिनय कट्टयाला शुभेच्छा देण्याकरता ज्येष्ठ साहितिक डॉ र.म.शेजवलकर उपस्थीत राहिले व त्यांच्या हस्ते कट्टयाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. नेहमी प्रमाणे कट्टयाची सुरवात ही इतनी शक्ती हमे दे ना दाता ह्या प्रार्थनेने करण्यात आली. त्या नंतर अभिनय कट्टयाच्या कलाकारांनी जनजागृती पर ‘मी जबाबदार’ हे पथनाट्य सादर केले. त्यातून सर्व सामान्य जनतेला कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

अभिनय कट्टा हा नेहमीच सामाजिक उपक्रमांन मध्ये अग्रेसर असतो. कोविडच्या काळात देखील अभिनय कट्टयाचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती हे आपल्याला ९ महिने we are for you ह्या त्यांच्या अभियानातून जेष्ठ नागरिकांची व सर्वच नागरिकांची सेवा करताना दिसले. अभिनय कट्टयावर, राजन मयेकर आणि वैभव चव्हाण हे एकपात्री सादर करताना तर कदिर शेख, परेश दळवी, आदित्य नाकती, सई कदम, सलोनी पाटील, न्यूतन लंके हे कलाकार कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन केले. तर प्रशांत सकपाळ आणि कल्पेश डुकरे यांनी वि वा शिरवाडकर लिखित नाटक बसते आहे. या एकांकिकेचा एक प्रवेश सादर केला. कट्टयाचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.

कट्टयाचे संस्थापक किरण नाकती ह्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना ठाणेकर नागरिकांचे, पत्रकारांचे व सर्वच स्थारीतील मान्यवरांचे आभार मानले व सगळ्यांना कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच रविवार ७ मार्च २०२१ पासून ‘अभिनय कट्टा दशकपूर्ती महोत्सव ऑनलाईन’ स्वरूपात होणार असून त्याची रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल अशीही माहिती देण्यात आली.

First Published on: March 3, 2021 9:36 PM
Exit mobile version