अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर धडक कारवाई

अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर धडक कारवाई

महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचे निर्देशानुसार चार जे प्रभागाच्या सहा.आयुक्त सविता हिले यांनी कल्याण (पूर्व) शिवाजी कॉलनी रोडवर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या एकूण 7 वेदर शेड्स हटवण्याची निष्कासनाची धडक कारवाई बुधवारी केली. कारवाई फेरीवाला हटाव पथकातील कर्मचार्‍यांच्या सहाय्याने करण्यात आली.
नऊ आय प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण (पूर्व) कल्याण शीळ रोडवरील एकूण 4अनधिकृत गाळ्यांच्या बांधकामावर आणि शहर विद्रुपीकरण करणार्‍या 5 शेड्स, 2 टपर्‍यांवर हटवण्याची धडक कारवाई केली. ही कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी यांच्या मदतीने आणि 1 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.

तसेच 10/ई प्रभागाचे सहा.आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली (पूर्व) मानपाडा रोड ते स्टार कॉलनी आणि साईबाबा मंदिर ते मानपाडा रोड या 30 मी. रुंद रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होत असलेल्या जुन्या चाळीच्या बांधकामावर आणि 35 टपर्‍या , 27 शेड्स, आठ हातगाड्या अशा एकूण 70 अतिक्रमणांवर धडक कारवाई दिवसभरात केली. ही कारवाई अनधिकृत बांधकाम विभागातील कर्मचारी, फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी आणि महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि एका जेसीबीचा वापर करून करण्यात आली.

First Published on: November 30, 2023 10:34 PM
Exit mobile version