Citizen Protest : व्यवसायिकता थांबवण्यासाठी आंदोलन

Citizen Protest : व्यवसायिकता थांबवण्यासाठी आंदोलन

ठाणे – उन्हाळा सुरु झाला कि शाळा – महाविद्यालयांना सुट्या लागतात, अशावेळी मोठ्या संख्येने क्रिडाप्रेमी खेळण्यासाठी मैदानात उतरत असतात मात्र ठाण्याच्या गावदेवी मैदानात नेहमी विविध कार्यक्रम, खरेदी मेळावे आणि राजकीय सभा घेण्यात येतात त्यामुळे अनेकदा खेळाडूंना हक्काची रविवारची सुट्टी घरात बसून काढावी लागते, त्यात आता भर म्हणजे याच गावदेवी मैदानात गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी आंदोलन करत मैदान मोकळे करण्याची मागणी केली आहे.

गावदेवी मैदान खेळासाठी आहे, ते व्यापार करण्यासाठी नाही अशी घोषणा देत नौपाडयातील स्थानिकांनी मैदानात उतरतच आंदोलन केले, व्यावसायिक वापरासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या खासगी संस्थेच्या माध्यमातून मैदानावर आक्रमण केले असल्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत नौपाडतीन मुलांनी मैदानी खेळ खेळायचे कुठे असा प्रश्न पडला आहे.

दरम्यान महापालिका याकडे जाणून बुजून कानाडोळा करीत असल्याचा आरोप आंदोलन करत्यांनी केला. नौपाडा भागातील ठाणे महापालिकेचे अतिशय जुन्या गावदेवी मैदानावर ठाणे भाजप जिलाध्यक्ष संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थने गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन लावले आहे. १२ ते २१ एप्रिल या १० दिवसांसाठी प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यासाठी संपूर्ण मैदान व्यापले आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून आम्ही खेळणार कुठे असा सवाल खेळाडूंनी उपस्थित केला आहे. दरम्यान महापालिकेने त्वरित प्रदर्शन हटनले नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार नुकतेच सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली प्रदर्शन ठिकाणी आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.

आंदोलनकर्ते ताब्यात
हकाच्या मैदानासाठी स्थानिकांनी आंदोलन करण्याची परवानगी नौपाडा पोलिसांकडे घेतली होती. कायद्याच्या चौकटीत आंदोलन छेडण्यात आले असताना पोलिसांनी ८ ते १० आंदोलकत्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

First Published on: April 21, 2024 7:06 PM
Exit mobile version